मुसळधार पावसाने पुण्याला झोडपले; वाहतूक विस्कळीत

सकाळ वृत्तेसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

णे : शहर आणि परिसरामध्ये शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शहराच्या विविध भागांत झाडे पडण्याच्या घटना घडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

पुणे : शहर आणि परिसरामध्ये शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शहराच्या विविध भागांत झाडे पडण्याच्या घटना घडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. शनिवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर ओसरला. दरम्यान, पुढील आठ दिवस शहरात संततधार पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी शहरात हजेरी लावली. शुक्रवारी रात्री पावसाने आणखी जोर धरला. शहर आणि परिसरामध्ये शनिवारी सायंकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. शहराच्या अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचले. काही भागांत रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती. काही भागांतील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. 

दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. शहरात शनिवारी सकाळपासून पडणाऱ्या पावसाचा जोर सायंकाळी पाच वाजेनंतर कमी झाला. पुढील आठ दिवस शहरामध्ये संततधार पाऊस पडणार असल्याची शक्‍यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. 

शहर आणि उपनगरांना पावसाने झोडपले 
- अनेक ठिकाणी झाडे पडली 
- बाजीराव रस्ता, कर्वे रस्ता, गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्ता, शिवाजी रस्त्यावर वाहतूक संथ गतीने 
- धायरी, कोंढवा, नऱ्हे, बालेवाडी, औंध, बाणेर, हडपसर कात्रज भागांत मुसळधार 
- मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर साचले पाणी 
- पावसामुळे शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची तारांबळ 
- पदपथावरील विक्रेत्यांचे हाल 

पीएमपी सेवेवर परिणाम 
शहर आणि उपनगरामध्ये शनिवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. त्याचा परिणाम पीएमपीच्या सेवेवर झाला. पीएमपीच्या गाड्या बंद पडण्याचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांचे हाल झाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic disruption due to Heavy rains Pune