पुणे : काँग्रेसच्या परिवर्तन रॅलीमुळे विद्यापीठ चौकात मोठी वाहतूक कोंडी

काँग्रेसच्या वतीन आयोजित करण्यात आलेल्या परिवर्तन रॅलीमुळे विद्यापीठ चौक आणि परिसरात शनिवारी (ता. ५) दुपारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
University Chowk Traffic
University Chowk TrafficSakal
Summary

काँग्रेसच्या वतीन आयोजित करण्यात आलेल्या परिवर्तन रॅलीमुळे विद्यापीठ चौक आणि परिसरात शनिवारी (ता. ५) दुपारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

पुणे - काँग्रेसच्या (Congress) वतीने आयोजित करण्यात आलेल्या परिवर्तन रॅलीमुळे (Parivartan Rally) विद्यापीठ चौक (University Chowk) आणि परिसरात शनिवारी (ता. ५) दुपारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic) झाली होती. चौक ओलांडण्यासाठी ३० ते ४० मिनिटांचा वेळ लागत असल्याने वाहनचालक अक्षरक्ष: वैतागले होते.

काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पुणे दौऱ्याच्या निमित्ताने विद्यापीठ चौक ते काँग्रेस भवन या मार्गावर परिवर्तन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी तीन ते सहा दरम्यान ही रॅली पार पडली. त्यामुळे दुपारी दोन पासूनच अनेक काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी चौकात आले होते. कार्यकर्त्यांची गर्दी वाढतच गेल्याने या चौकातून विविध ठिकाणे जाणाऱ्या रस्त्यांची एकच लेन सुरू होती. त्यामुळे वाहतूक मंदावली होती. त्यात रॅली सुरू होण्यास उशीर झाल्याने कोडीत आणखी भर पडली होती. एकच लेन सुरू असल्याने हा चौक ओलांडण्यासाठी वाहन चालकांना ३० ते ४० मिनिटांचा वेळ लागत होतो. तसेच परिसरात देखील मोठी कोंडी झाली होती. त्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला. या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. मात्र रस्त्यावर असलेले कार्यकर्ते आणि वाहनांची वाढलेली संख्या यामुळे पाचपर्यंत या मार्गावर कोंडी होती.

University Chowk Traffic
पुणे : क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास सशर्त परवानगी

राजकीय कार्यक्रमांचा वाहन चालकांना विनाकारण फटका सहन करावा लागला. मला रुग्णालयात जायचे होते. मात्र या मार्गावर मी जवळपास एक तास वाहतूक कोंडीत अडकले होते. सर्वसामान्यांच्या जिवाला काही किंमत आहे की नाही? असा प्रश्‍न यातून उपस्थित होतो.

- गायत्री क्षीरसागर, विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीत सापडलेल्या नोकरदार

रॅलीमुळे चौकात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. त्यामुळे सर्वच मार्गांवरील एक ते दीड लेन सुरू होती. त्याचा वाहतुकीवर परिमाण झाला. मात्र कोठेही वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली नव्हती.

- चतु:श्रृंगी वाहतूक विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com