पुणेकरांच्या आठवड्याची सुरुवात ट्रॅफिक जॅमने; संध्याकाळीही डोकेदुखी ठरण्याची शक्यता

शरयू काकडे
Monday, 10 August 2020

शहरात सध्या विविध ठिकाणी मेट्रोचे काम सुरु आहेत. त्यात काही दिवसांपासून पुणे विद्यापीठ चौकातील चुकीच्या पध्दतीने बांधण्यात आलेले दोन पुल पाडण्याचे काम सुरु करण्यात आले असून या भागातील वाहतूक वळविण्यात आली आहे, त्यामुळे सकाळच्या वेळात आज विद्यापीठ चौकापासून यशदापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

पुणे :  पुण्यात अनलॉक प्रक्रिया सुरु करण्यात आली असून हळू हळू शहर पुर्वपदावर येत आहे. पुन्हा शहरात ठिकठिकाणी ट्रॅफिक जॅम होत असल्याचे चित्र दिसत आहे. पुण्यात मेट्रोचे काम सुरु असल्याने वाहतूक कोंडी होत असते. आज शहरात पुणे विद्यापीठ चौक तसेच पुणे- मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना आता पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान संध्याकाळी रहादारीच्या वेळी पुन्हा वाहतूक कोंडी होणार असून नागरिकांची गैरसोय होणार आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शहरात सध्या विविध ठिकाणी मेट्रोचे काम सुरु आहेत. त्यात काही दिवसांपासून पुणे विद्यापीठ चौकातील चुकीच्या पध्दतीने बांधण्यात आलेले दोन पुल पाडण्याचे काम सुरु करण्यात आले असून या भागातील वाहतूक वळविण्यात आली आहे, त्यामुळे सकाळच्या वेळात आज विद्यापीठ चौकापासून यशदापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान, पुणे - मुंबई महामार्गावर वारजे येथे एक टेम्पो बंद पडल्याने सकाळच्या वेळात वाहतूकीचा वेग काहीसा मंदावला होता, त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.  

तहसीलदार महिलेच्या पतीकडून जीवाला धोका असल्याची 'या' राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली तक्रार 
Pune univercity Work  in Porgress traffic

तसेच शहरात गिरीधर भवन चौकाकडून सेव्हन लव्हज चौकाकडे जाणारा मार्गावरही सकाळपासून वाहतुक कोंडी झाली आहे. एकेरी वाहतुकीमुळे या कोंडीत भर पडत असून स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Image may contain: one or more people, sky, outdoor and nature

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic jam at the beginning of the week in pune