चिंचवड-केशवनगर येथे वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

केशवनगर महापालिका शाळेपासून (अभिनव चौक) पुढे कुणाल इस्टेटपर्यंत रस्त्याचे काम चालू आहे. या रस्त्यावर काळेवाडी पुलाकडून चिंचवडला येणारी एकेरी वाहतूक सुरू आहे. केशवनगरकडून काळेवाडीला महापालिका मराठी शाळेपासून, काकडे टाऊनशिप, मोरया गोसावी क्रीडा संकुल, कुणाल इस्टेट अशी वाहतूक वळविण्यात आली आहे. 

पिंपरी - चिंचवड-केशवनगर येथे क्राँक्रीट रस्त्याच्या कामासाठी महापालिका शाळेपासून पुढे एकेरी मार्ग करण्यात आला आहे. मात्र, येथून सर्रास दुहेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे येथे सध्या वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. 
केशवनगर हा दाट लोकवस्तीचा भाग आहे. महापालिकेतर्फे येथून काळेवाडी पुलापर्यंत क्राँक्रिट रस्ता करण्याचे काम सध्या सुरू आहे. केशवनगर महापालिका शाळेपासून (अभिनव चौक) पुढे कुणाल इस्टेटपर्यंत रस्त्याचे काम चालू आहे. या रस्त्यावर काळेवाडी पुलाकडून चिंचवडला येणारी एकेरी वाहतूक सुरू आहे. केशवनगरकडून काळेवाडीला महापालिका मराठी शाळेपासून, काकडे टाऊनशिप, मोरया गोसावी क्रीडा संकुल, कुणाल इस्टेट अशी वाहतूक वळविण्यात आली आहे. 

चिंचवडमधून येणाऱ्या वाहनचालकांना काळेवाडीला जाण्यासाठी लांबचा वळसा घालून जावे लागत आहे. पर्यायाने, दुचाकी आणि चारचाकी वाहनचालक एकेरी मार्गावर दुहेरी वाहतूक करीत आहेत. त्यामुळे येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याचे चित्र मंगळवारी पाहण्यास मिळाले. वाहतूक कोंडीमुळे पादचाऱ्यांना रस्त्याने ये-जा करणे अवघड जात आहे. त्याशिवाय, क्राँक्रीट रस्त्याचे काम अर्धवट झाले असल्याने विरुद्ध दिशेने वाहन चालविणारे दुचाकीचालक वाहन घसरून पडत आहेत. येथे दुहेरी वाहतूक होत असताना त्याला अटकाव करण्यासाठी वाहतूक पोलिसही नेमलेले दिसत नाही. 

"केशवनगर येथे रस्त्याच्या कामासाठी केलेल्या एकेरी मार्गाची वाहनचालकांनी अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे. नियम तोडून दुहेरी वाहतूक केल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. महापालिकेने एकेरी वाहतुकीबाबत लावलेल्या माहिती फलकावर पर्यायी मार्ग कुठून कसा आहे, याची स्पष्ट कल्पना देणे अपेक्षित आहे. तशी माहिती दिल्यास वाहनचालकांची सोय होऊ शकेल.'' 
- उमेश देशमुख, नागरिक 

"केशवनगर येथे सुरू असलेल्या क्राँक्रिट रस्त्याचे अर्धे काम झाले आहे. काम पूर्ण होण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागेल. या कामासाठी एकेरी वाहतूक केलेली आहे. पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत माहितीफलकही लावला आहे. नागरिकांनी त्यानुसार वाहतूक करणे अपेक्षित आहे.'' 
- शिरीष पोरेडी, प्रवक्ते, स्थापत्य विभाग 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Traffic jam at Chinchwad Keshavnagar