पुणे : अंगारकी अन् नाताळनिमित्त मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

पुणे : अंगारकी संकष्ट चतुर्थी आणि नाताळनिमित्ताने नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्त्यावरील वाहतूक अतिसंथ गतीने सुरू आहे. 

पुणे : अंगारकी संकष्ट चतुर्थी आणि नाताळनिमित्ताने नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्त्यावरील वाहतूक अतिसंथ गतीने सुरू आहे. 

अंगारकी चतुर्थी आणि नाताळनिमित्त नागरिक मंदिर आणि चर्चमध्ये मोठ्या प्रमाणात जातात. यावर्षी चतुर्थी आणि नाताळ एकाच दिवशी आल्याने रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू आहे. शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावरील सिग्नल यंत्रणाही बंद असून पोलिस वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. चतुर्थीच्या निमित्ताने शहराच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक मध्य भागातील गणपतीच्या दर्शनासाठी आल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे. संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले होते तरी, देखिल शहराच्या मध्य भागात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली आहे. 

शिवाजी रस्त्यावर बस आणि अवजड वाहनांना मज्जाव करण्यात आला आहे. मात्र, ही वाहने या रस्त्यावर असल्याने महापालिका, शनिवारवाडा, दगडूशेठ गणपतीपासून पूढे स्वारगेटपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक हा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे ही वाहने बाजीराव रस्त्यावर आल्याने महापालिकापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. नागरिकांना जर बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता आणि शहराच्या मध्यवर्ती भागात जाणे टाळावे असे आवाहन करण्यात येत आहे. 

Web Title: Traffic jam in the city on the occasion on Angarki and Christmas