esakal | पुणे : नदीपात्रातील रस्ता बंद; कर्वे रस्त्यावर वाहतूक कोंडी
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic jam on the Karve road due to closed   riverbank road in pune

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्याने नदी पात्रालगतचा रस्ता बुधवारी सकाळी वाहतूकीसाठी बंद झाला. यामुळे कर्वे रस्त्यावरील महर्षी कर्वे पुतळा चौक ते खंडोजी बाबा चौकापर्यंत तसेच एरंडवणे भागात बुधवारी सकाळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

पुणे : नदीपात्रातील रस्ता बंद; कर्वे रस्त्यावर वाहतूक कोंडी

sakal_logo
By
विनायक बेदरकर

कोथरूड : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्याने नदी पात्रालगतचा रस्ता बुधवारी सकाळी वाहतूकीसाठी बंद झाला. भिडे पुल पाण्याखाली गेल्याने कर्वे रस्त्यावरील महर्षी कर्वे पुतळा चौक ते खंडोजी बाबा चौकापर्यंत तसेच एरंडवणे भागात बुधवारी सकाळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

संपूर्ण कर्वे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नदीपात्रालगतचा पर्यायी रस्ता वाहतूकीसाठी बंद झाल्याने मुख्य कर्वे रस्त्यावरील वाहतूकीचा ताण वाढला आहे. सकाळ पासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे कर्वे रस्त्यावरील वाहतूक संथ झाली होती. अशातच पावसापासून संरक्षण होण्यासाठी अनेक नागरिकांनी दुचाकी वाहनाऐवजी चारचाकी वाहने रस्त्यावर आणल्यामुळे वाहतूक कोंडीत भरच पडली.

‎कर्वे रस्त्यावरील पौड फाटा चौक ते खंडोजीबाबा चौक या अंतरामध्ये मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. या अंतरामध्ये प्रभात रस्ता सोडल्यास पर्यायी रस्ता नसल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. त्यामुळे शाळा- महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि कामास जाणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

‎स्थानिक नागरिक विजय मुंडले म्हणाले, प्रत्येक पावसाळ्यात हि समस्या निर्माण होते. नागरिकांनी आवश्यकतेनुसारच चारचाकी वाहनांचा वापर केल्यास वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल. जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूकीचा वापर होणे गरजेचे आहे.

loading image
go to top