कात्रज बायपास मार्गाचे रुंदीकरण रखल्याने वाहतूककोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

कात्रज बायपास मार्गाचे रुंदीकरण रखल्याने वाहतूककोंडी

उंड्री : कात्रज-मंतरवाडी बायपास महामार्गाचे खडी मशीन, पिसोळी, उंड्री, हांडेवाडी चौकादरम्यान रुंदीकरण रखडले असून, अरुंद पुल आणि पथदिवे नसल्याने रात्रीवेळी अपघातसदृशस्थिती निर्माण झाली आहे. पिसोळी आणि उंड्रीतील (कलरी) ओढ्यावरील पुल अरुंद आणि एकदम चढ-उतार, दिशादर्शक फलक नसल्याने गोंधळ उडत असल्याची तक्रार अवजड वाहनचालकांनी सांगितले.

पिसोळीतील पद्मावती मंदिराशेजारील रस्त्यावर ड्रेनेज लाईनचे चेंबर खाली रस्ता वर आणि रस्ता खाली चेंबर वर अशी अवस्था असल्याने मोठी वाहने आदळतात, तर दुचाकीचालक कोलमडून अपघात होत आहेत. पद्मावती आणि धर्मावत पेट्रोल पंप चौकात उतार आणि चढण असल्याने नवख्या वाहनचालकांची फसगत होत असल्याचे सुनील गायकवाड, प्रमोद झोडगे यांनी सांगितले.

अचानक ब्रेक दाबून वाहन थांबविले, तर पाठीमागून वाहने धडकून अपघात होत असल्याने वाहनचालकांमध्ये तूतू मैमैचे प्रकार वारंवार होत आहेत. बायपास रस्त्यावर चौकामध्ये सिग्नल बसवावेत, दिशादर्शक फलक आणि रिफ्लेक्टर बसवून वाहतूक सुरळीत करण्याची प्रशासनाने व्यवस्था करावी.

- सुभाष टकले, राजेंद्र भिंताडे, उंड्री

धर्मावत पेट्रोल पंप आणि पद्मावती चौकामध्ये रस्ता अरुंद असून, छोटी वाहने घुसखोरी करतात, त्यामुळे बायपास महामार्गावर वाहतूककोंडी होऊन दूरपर्यंत रांगा लागतात. दुचाकी साईडपट्ट्यावरून पुढे नेत असताना अपघात होतात.

- गणेश कानडे, प्रमोद झोडगे, स्कूलबसचालक

डीपी, खांब आणि भूमिगत केबल्सचा अडथळा असल्याने महामार्गाचे रुंदीकरण रखडले आहे. महावितरणकडे पाठपुरावा केला असून, त्यासाठी महावितरणने 10 कोटी रुपयांची मागणी केली आहे.

-अजय देशपांडे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम