मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जून 2019

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मळवली ते ताजे पंपादरम्यान बोरज गावाजवळ आज (ता. 13) ओव्हरहेड गॅंट्रीज बसविण्याच्या कामामुळे द्रुतगती मार्गावरील मुंबई कडे जाणारी वाहतुक दोन तास ठप्प होती.

मळवली : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मळवली ते ताजे पंपादरम्यान बोरज गावाजवळ आज (ता. 13) ओव्हरहेड गॅंट्रीज बसविण्याच्या कामामुळे द्रुतगती मार्गावरील मुंबई कडे जाणारी वाहतुक दोन तास ठप्प होती.

दुपारी बारा ते दोन या वेळेत रस्ते विकास महामंडळाकडून मुंबई लेनवर ओव्हरहेड गॅंट्रीज बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यादरम्यान मुंबईकडील वाहतुक दोन तास पुर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. द्रुतगती मार्गावरील अवजड वाहने किलोमीटर क्रमांक ६६ या ठिकाणी थांबविण्यात आली होती. हलकी चार चाकी वाहने किवळे येथून जुण्या राष्ट्रीय महामार्गावर वळविण्यात आली होती.

यादरम्यान सोमाटणे आणि वरसोली येथील जुन्या महामार्गावरील टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Web Title: traffic jam at Mumbai Pune Express highway for 2 hours