नळ स्टॉप चौकातील वाहतूक कोंडी फुटेना

नळ स्टॉप चौकात महापालिकेच्या वतीने महामेट्रोने बाधलेला दूमजली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
traffic jam Nal Stop Chowk
traffic jam Nal Stop Chowksakal

मयुर कॉलनी : पश्चिम पुण्याला जोडणारा महत्त्वाचा कर्वे रस्ता,या रस्त्यावर नळ स्टॉप चौकात महापालिकेच्या वतीने महामेट्रोने बाधलेला दूमजली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.वाहतूक कोंडी कमी होईल या उद्देशाने हा दूमजली उड्डाणपूल बांधण्यासाठी महापालिकेने तब्बल ३८ कोटी रुपये खर्च केले.५४२ मिटर लांब,१५ मिटर रुंद, वाहतूकीसाठी दोन्ही बाजूला दोन मार्ग तयार करण्यात आले.या चौकामध्ये म्हात्रे पूल, डेक्कन, विधी महाविद्यालय रस्ता येथून मोठ्या प्रमाणात वाहने येतात.

विधी महाविद्यालय रस्ता व म्हात्रे पूल या मार्गाने येणारी अनेक वाहने दूमजली उड्डाणपूलाखालून पौंड फाट्याकडे जातात.मात्र पूलाखालून पौड फाट्याकडे जाणारा सर्व्हिस रस्ता फक्त साडेपाच ते सहा मिटर शिल्लक राहिला आहे. सायंकाळी पुलाखालून व वरतून येणारी वाहने भरपूर असल्याने एसएनडीटी महाविद्यालयासमोर कोंडी होत आहे.तर सकाळी पौड फाटा येथून डेक्कनच्या दिशेने जाताना रांका ज्वेलर्स समोर असलेल्या सिंग्नलला कोंडी होते.

वाहतूक पोलिस कर्मचारी वाढवून मिळावे.रस्ते सुस्थितीत करुन द्यावे.महापालिका व विविध कंपन्यांच्या मार्फत खोदाई होते, त्याला आळा घालावा, मुंबईच्या धर्तीवर पुण्यात एकमेकांना पूरक ( सिंक्रोनाइझेशन) पध्दतीने सिंग्नलची रचना करावी. पदपथ, रस्त्यावर वाढलेली अतिक्रमणे काढावीत.

- जयराम पायगुडे पोलिस निरीक्षक वाहतूक विभाग कोथरूड

कर्वे रस्ता दोन वेळा रूंदीकरण झालेला मी पाहिलं आहे. नुसते उड्डाणपूल बांधून किंवा रस्ते रूंदीकरण करुन वाहतूक कोंडी सुटणार नाही.यासाठी पर्यायी रस्ते निर्माण केले पाहिजेत.जसा की बालभारती ते पौड रस्ता झाला तर नळ स्टॉप चौकातील वाहतूकीचा ताण कमी होईल.

- दिलीप शहा व्यवसायिक कर्वे रस्ता.

रात्री सहा ते नऊ वाजेपर्यंत जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी असते.

पूल सुरू झाल्यापासून असं होतंय, ४६ वर्षात अशी परिस्थिती झाली नव्हती.पदपथ कमी करावा समस्या कमी होईल.बस थांबा बंद केला आहे.सोनल कार्यालयात ते एसएनडीटी या भागातील बसथांबे काढून टाकण्यात आले.सामान्या नागरिकांना बसने प्रवास करावा लागतो मात्र नळ स्टॉप चौकात बसथांबे नाहीत.

-सुनिल दिघे व्यावसायिक कर्वे रस्ता.

महापालिका प्रकल्प विभागाकडून कोंडीबाबत करावयाच्या उपाययोजना संदर्भात महामेट्रो सोबत झालेला पत्रव्यवहार

उड्डाणपुलाच्या खालील व रस्त्याच्या कडेला असलेला राडारोडा तो त्वरित काढण्यात यावा, रेस्कॉन फॅक्टरी कंपाऊंडला लागून कर्वे रस्त्याच्या बाजूला पदपद कमी करून वाहतुकीस उपलब्ध करून द्यावा. कॅनॉल रस्ता व पाळंदे कुरियर / रेस्कॉन फॅक्टरी कडून येणारा रस्ता मेट्रोच्या जिन्या खालून जोडण्यासाठी आराखडा तयार करून त्याबाबत चर्चा करावी. उड्डाणपुलाच्या खाली कॉलम सोळा-सतरा मध्ये यु टर्न ची सोय करण्यात यावी.अशी माहिती मुख्य अभियंता प्रकत्प यांच्याकडून देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com