पिंपरी : कंटेनर व ट्रक अडकल्यामुळे वाहतूक कोंडी

संदीप घिसे
बुधवार, 18 एप्रिल 2018

पिंपरी : नाशिक फाटा येथून चिंचवडकडे जाणाऱ्या तसेच चिंचवडकडून नाशिक फाटाकडे येणाऱ्या मार्गात पिंपरी येथील ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर व मालवाहतूक ट्रक अडकल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

ही घटना आज (बुधवार) पहाटे पिंपरी घडली. चिंचवड स्टेशनकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गात पिंपरी येथील ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर नाशिक फाटा येथून चिंचवडकडे येणाऱ्या मार्गात मालवाहतूक ट्रक अडकला.

यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. यामुळे पोलिसांनी येथील रस्त्यावरील वाहतूक सर्व्हिस रोडने वळविली. यामुळे सर्व्हिस रोडवरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. अक्षय तृतिया सणाच्या दिवशीच वाहतूक कोंडी झाल्यामुळे नागरिक आणि कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले.

Web Title: Traffic jam at Pimpri grade separator