#TrafficUpdates : पुणेकरांचा विकेंड गेला कोंडीत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

पुणे :संकष्ट चतुर्थी, आठवड्याचा शेवटचा दिवस, संततधार पाऊस, दुपारी सुटलेल्या शाळा यामुळे शनिवारी शहराच्या मध्य भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता यासंह शहराच्या मध्य भागात वाहतूक कोंडी झाली. 

पुणे :संकष्ट चतुर्थी, आठवड्याचा शेवटचा दिवस, संततधार पाऊस, दुपारी सुटलेल्या शाळा यामुळे शनिवारी शहराच्या मध्य भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता यासंह शहराच्या मध्य भागात वाहतूक कोंडी झाली. 

संकष्ट चतुर्थीनिमित्त उपनगर आणि शहराच्या वेगवेळ्या परिसरातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे शनिवारवाडा, कसबा पेठ परिरसामध्ये नागरिकांची मोठी गर्दी झाली. चतुर्थीमुळे शिवाजी रस्त्यावरची वाहतूक टिळक रस्त्यावर वळविण्यात आली होती. परिणामी, टिळक रस्तावर सर्व वाहने आल्याने रस्तावर वाहतूक कोंडी होऊन सुमारे एक ते दिड तास वाहने अडून पडली होती. याचा परिणाम पेठांमधील लहान रस्त्यावर देखील झाला. 

चतुर्थीमुळे दगडूशेट गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या नागरिकही या कोंडीत अडकून पडले. आठवड्याचा शेवटा दिवस त्यात दुपारी सुटलेल्या शांळामुळे कोंडीत भर पडली. त्यात पावसाने हजेरी लावणल्याने दुचाकी व पादचाऱ्यांची धांदल उडाली याचाही परिणाम वाहतूक कोंडीवर झाला. परिणामी, पुणेकरांचा आठवड्याचा शेवटचा दिवस वाहतूक कोंडी गेला. 

#TrafficUpdates : नांदेड फाटयाजवळ वाहतूक कोंडी झाली असून 4 वाजल्यापासून वाहतूक वेग मंदावला आहे. अरुंद रस्ता, नांदेड गावठाणाकडे रस्ता अरुंद अनेक अतिक्रमणे, विजेचे खांबमुळे कोंडी असून अंदाजे 8.00 नंतर सुटेल. पर्यायी रस्ता म्हणून नांदेड सिटीमार्गाचा वापर करावा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic Jam in Pune