पुणे-अहमदनगर महामार्गावर मोठी कोंडी; रस्ते झाले जलमय

Pune Ahmednagar highway.jpg
Pune Ahmednagar highway.jpg

पुणे : पुणे- अहमदनगर महामार्गावर वाघोली, कोरेगाव भीमा येथील खड्ड्यांमुळे आणि साचलेल्या पाण्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. 

पुणे-अह​मदनगर- औरंगाबाद या राज्य महामार्गावरील शिरूर तालुक्यातील कोरेगाव-भीमा आणि हवेली तालुक्यातील वाघोली येथे रस्त्यांची अक्षरशा दुरावस्था झाली आहे. महामार्गाला मोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.  

कोरेगाव-भीमा येथे तर महामार्गावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातूनच वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. याच दुरवस्था झालेल्या कोरेगाव-भीमा येथील रस्त्यामध्ये रात्रीच्या सुमारास एक व्यक्ती देखील खड्ड्यात पडल्याचे समजते. 

वाघोलीमध्ये देखील रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. दोन्ही ठिकाणी दुतर्फा दोन ते तीन किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच वाघोलीत 11 कोटी रुपये खर्च करुन महामार्गाचे काम केले होते परंतु, त्यामुळे काहीही फरक पडला नसून त्या महामार्गावर पुन्हा खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक संथ गतीने चालू असून परिणामी वाहतूक कोंडी होत आहे. यात वाहनचालक , सर्वसामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com