सलग सुट्यांमुळे पुणे-सातारा रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी

महेंद्र शिंदे
शनिवार, 14 एप्रिल 2018

टोल नाक्यावर विक्रेत्यांचा सुळसुळाट
टोल नाक्यावर वाहनांची गर्दी झाल्याने टोल देऊन पुढे जाण्यास वाहनांना वेळ लागत होता. त्यातच टोल नाक्यावर गेल्या काही दिवसांपासून फिरत्या विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे या विक्रेत्यांच्या अडथळ्याचा सामनाही वाहन चालकांना करावा लागत होता.

खेड-शिवापूर : सलग आलेल्या सुट्ट्यामुळे शनिवारी सकाळपासून पुणे-सातारा रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे सकाळपासून खेड-शिवापूर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीत अडकल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. 

शनिवार आणि रविवार सलग जोडून सुट्या आल्याने नागरीक बाहेरगावी फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत. मात्र सुसाट निघालेल्या नागरीकांना पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर अड़कावे लागत आहे. शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून येथील साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी असलेल्या टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. याठिकाणी सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांची रांग लागली आहे. 

या टोल नाक्यावर सुमारे दहा ते पंधरा मिनिटे थांबावे लागत असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. 

टोल नाक्यावर विक्रेत्यांचा सुळसुळाट
टोल नाक्यावर वाहनांची गर्दी झाल्याने टोल देऊन पुढे जाण्यास वाहनांना वेळ लागत होता. त्यातच टोल नाक्यावर गेल्या काही दिवसांपासून फिरत्या विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे या विक्रेत्यांच्या अडथळ्याचा सामनाही वाहन चालकांना करावा लागत होता.

Web Title: traffic jam on Pune-satara highway