तळेगाव-चाकण महामार्गावर अभूतपूर्व कोंडी; 22 किमीपर्यंत रांगा

traffic
traffic

तळेगाव स्टेशन : तळेगाव-चाकण महामार्गावरील खालुंबरे येथे बुधवारी (ता.३१) टेम्पोवर झाड कोसळल्याने पडल्यामुळे,पहाटेपासून वाहतुकीची अभूतपूर्व कोंडीं झाली.मुंबई पुणे महामार्ग-तळेगाव ते चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील मेदनकरवाडीपर्यत जवळपास २२ किमी अंतरावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.कोंडीचा परिणाम चाकण-तळेगाव उदयोगांवर जाणवला.

बुधवारी पहाटे चारच्या दरम्यान चाकणकडून मुंबईकडे चाललेलया टेम्पोवर पहाटे दरम्यान खालुंबरे (ता.खेड) येथे ह्युंडाई फाटयावर वडाचे पुरातन झाड कोसळल्याने वाहतुक बंद पडली.वाहनाचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने चालक अथवा कुणाला इजा झाली नाही.परिणामी चाकण-तळेगाव महार्गावरील ट्रेलर कंटेनर टॅन्करसारख्या अवजड वाहनांची रहदारी ठप्प झाली.अपघातग्रस्त झाड आणि टेम्पो हटवण्यात उशीर झालयाने कोंडी वाढत जाऊन पश्चिमेकडे तळेगाव बाजूने थेट मुंबई-पुणे महामार्गावर जवळपास १५ किलोमीटरपर्यत वाहनांच्या रांगा गेल्या.याचाच परिणाम पुर्वेला चाकण शिक्रापुर रस्त्यावरील मेदनकरवाडीपर्यत वाहतुक ठप्प झाली.सकाळी सातपर्यत सुमारे झाड बाजूला केल्यानंतर सुरळीत होऊ पाहणारी वाहतुक भंडारा डोंगर पायथ्याजवळ रस्त्याच्या मधोमध कंटेनर बंद पडल्यामुळे पुन्हा बंद पडली.

तळेगाव वाहतूक शाखेचे अनंत रावण आणि सहकार्यांनी कंटानर बाजूला केल्यानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत होत गेली.मात्र काही बेशिस्त चालकांनी उलट्या दिशेने वाहने घुसवत एकाच बाजूने तीन रांगा केल्याने कोंडी सुटण्यास खुप वेळ गेला.तळेगाव स्टेशन तसेच चाकण एमआयडीसीमधील अंतर्गत जोड रस्त्यांवरही कोंडी झाली. स्कुल आणि कामगार बसेस कोंडीत अडकल्याने विद्यार्थी आणि कामगारांना इप्सितस्थळी पोहोचण्यास उशीर झाला.पहील्या पाळीचे कामकार कसेबसे रस्ता काढत सकाळी आठपर्यंत कंपन्यांत पोहोचले.चाकण वाहतूक नियंत्रण पोलिसांच्या दिरंगाईमुळे झाड हटवण्यात विलंब आणि बेशिस्तीचा कळस झाला.तळेगाव-चाकण मार्गावर अपघात,वाहने बंद पडणे अथवा बेशिस्तीमुळे वारंवार कोंडी होते.याचाच परिणाम म्हणून उदयोगजगतासह लगतच्या गावांतील जनजीवन विस्कळीत होत आहे.

तळेगाव-चाकण महामार्गावरील प्रलंबित असलेल्या उडडाणपूलासह एमआयडीसी जोड रस्ता आणि महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु करण्याची मागणी आहे.पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत वाहतूक नियंत्रण शाखेने एचपी चौक,सुदवडी टोल नाका,तळेगाव स्टेशन येथे २४ तास वाहतूक पोलिसांची नेमणुक करण्याची गरज व्यक्त होत आहे.

चालक गाडीतच झोपल्यामुळे कोंडीत वाढ
जवळपास दोन तीन तास वाहने जागेवरुन तसूभरही पुढे न सरकल्याने कोंडीत अडकून वैतागलेले अवजड वाहनचालक गाडीच्या केबीनमध्ये झोपी गेले.सकाळी साडेआठच्या दरम्यान हळूहळू वाहने पुढे सरकत असताना गाढ झोपलेल्या चालकांची वाहने जागेवरच राहील्यामुळे मागची वाहनेही बराच वेळ तशीच उभी होती.ही बाब लक्षात आल्यानंतर तळेगावच्या मनोहरनगर,माळवाडी,वतननगर,कोटेश्वरवाडी येथील नागरिकांनी चालकांना झोपेतून उठवत वाहने मार्गस्थ केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com