भाजीविक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 जानेवारी 2019

चिखली - चिखली येथील देहू-आळंदी मुख्य रस्त्यावर हातगाडी आणि पथारीवाले रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने सांयकाळी तीन ते चार तास कोंडी होते. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. 

चिखली गावठाणात मंडईसाठी जागा नाही. भाजीविक्रेते देहू-आळंदी मुख्य रस्त्यावरच हातगाड्या लावून भाजी विक्री करतात. दोन-तीन वर्षांपूर्वी दहा-पंधरा असलेल्या भाजी विक्रेत्यांची संख्या अडीचशेच्या घरात गेली आहे.

सांयकाळी चारनंतर हे विक्रेते येथे विक्रीसाठी येतात व भाजी खरेदीसाठी नागरिकांचीही मोठी गर्दी असते. त्यामुळे येण्या-जाण्यासाठी रस्त्यात राहत नाही. त्याचवेळी या भागातील कंपनीतील कामगारांची सुटी होते. त्यामुळे रस्त्यावर मोठी गर्दी होऊन कोंडी होते. त्यामुळे या रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांना हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

याबाबत महापालिका अतिक्रमण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे म्हणाले, ‘‘आतापर्यंत पाचवेळा कारवाई केली आहे. सुमारे पाच टेंपो माल जप्त केला. या पुढेही वारंवार कारवाई सुरू ठेवण्यात येणार असून, रस्ता मोकळा करू देण्यात येईल.’’

रस्त्यावर बसून भाजी विक्री केल्यावर भाडे, विजेचे बिल आदींचा खर्च वाचतो. मात्र, होणाऱ्या कोंडीमुळे अग्निशामक दलाची वाहने, रुग्णवाहिका अनेक वेळा अडकल्याच्या घटना घडल्या आहेत. 
- विजय तापकीर, संभाजी बालघरे, नागरिक

Web Title: Traffic Jam by Vegetable Sellers