सातारा रस्त्यावर वेळू फाट्यावर वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 जानेवारी 2019

खेड-शिवापूर - पुणे-सातारा रस्त्यावरील वेळू फाट्यावरील वाहतूक कोंडी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रविवारी (ता. १३) वेळू फाट्यावर सुमारे चार तास दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय योजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. 

वेळू येथे उड्डाण पुलाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे येथील वाहतूक सेवा रस्त्याने वळविण्यात आली आहे. मात्र, वाहतुकीचे योग्य नियोजन न केल्याने शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

वेळू फाट्यावर आजही मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सायंकाळी पाच वाजल्यापासून वेळू फाटा ते दर्गा फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वेळू फाट्यावर ज्याठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे त्याठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक संथ होऊन वाहनांच्या रांगा वाढत गेल्या. 

वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांनी याबाबत संताप व्यक्त केला. राजगड पोलिस, महामार्ग पोलिस आणि वाहतूक वॉर्डन रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे काम करीत होते. परिसरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: traffic jam on velu phata satara road near khed shivapur