#PuneTraffic कंटेनर पुलाला धडकल्याने कोंडी

#PuneTraffic कंटेनर पुलाला धडकल्याने कोंडी

वारजे माळवाडी - पश्‍चिम बाह्यवळण महामार्गावर वारजे- वडगाव दरम्यान मुठा नदीच्या पुलावर सकाळी साडेसातच्या सुमारास मोठा कंटेनर पुलाच्या कठड्याला धडकून दुभाजकामध्ये अडकला. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक चार तासांहून अधिक वेळ खोळंबली होती. सकाळी अकरा वाजता वाहतूक सुरळीत झाली असली तरी, दुपारी बारालादेखील वाहनांच्या रांगा चार ते पाच किलोमीटरपर्यंत लागल्या होत्या.

वारजे वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक अमित घुले, हवालदार मुरलीधर कोकणे, रवींद्र अहिरे, सचिन गायकवाड, प्रवीण जगताप हे सकाळी  आठ वाजता घटनास्थळी पोचले. त्यांनी तातडीने दोन क्रेन मागविल्या. क्रेन येण्यास उशीर झाल्याने कंटेनर काढण्यास उशीर झाला. सकाळी या परिसरात मुसळधार पाऊसदेखील झाला होता. त्यामुळे कंटेनरचे केबिन घसरले असण्याची शक्‍यता काही नागरिकांनी व्यक्त केली. 
अपघातग्रस्त वाहन नदीवरील दोन्ही पुलामधील कठड्याला धडकला. तसेच, तो दुभाजकात अडकला होता. क्रेन येईपर्यंत एका लेनची वाहतूक सुरू ठेवली होती. अपघातात कंटेनरचालक जखमी झाला आहे. 

वाहनांच्या रांगा कात्रजपर्यंत
क्रेन आणल्यानंतर पावणेअकराच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली. मुंबईला जाणाऱ्या वाहनांच्या रांगा कात्रज, आंबेगाव, नऱ्हे गावापर्यंत लागल्या होत्या. दुपारी एकनंतर वाहतूक सुरळीत झाली. अपघातात पुलाच्या कठड्याची, दुभाजकाची मोडतोड झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com