सलग सुट्या आल्याने शहराबाहेर पडणाऱ्या रस्त्यावर कोंडी

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे, सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, अहमदनगर आणि पुणे- नाशिक रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी
Pune-Traffic
Pune-Trafficsakal

पुणे : शनिवार वगळता सलग सुट्या आल्याने शहरातून बाहेर पडणाऱ्या वाहनांच्या गर्दीने गुरुवारी (ता. १४) पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे, सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, अहमदनगर आणि पुणे- नाशिक रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली. सकाळी सात ते दुपारी एक आणि संध्याकाळी चारनंतर कोंडीत भर पडली होती. ही कोंडी सोडविण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू होते.

गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महावीर जयंती तर १५ एप्रिल रोजी (शुक्रवार) गुडफ्रायडे आहे. त्यामुळे १४ आणि १५ अशी सलग सुटी आहे. त्यात शनिवारची सुटी घेतल्यास गुरुवार ते रविवार (ता. १४ ते १७) अशी चार दिवसांची सलग सुटी मिळत आहे. त्यामुळे अनेकांनी शनिवारची सुटी घेत फिरायला जाण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळीच अनेक नोकरदार व व्यावसायिक सहकुटुंब विविध कामे आणि पर्यटनासाठी बाहेर पडल्याने गुरुवारी पहाटेपासून पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे, सोलापूर, सातारा, अहमदनगर आणि पुणे-नाशिक रस्त्यावर गर्दी झाली होती.

यातील सर्वाधिक गर्दी एक्स्प्रेस वे वर पाहायला मिळाली. पुणे-नाशिक रस्त्यावर कळंबपर्यत कोंडी होती. तर सातारा रस्त्यावर खेडशिवापूरपर्यंत वाहतूक संथगतीने सुरू होती. सोलापूर रस्त्यावर थेऊर तर अहमदनगर रस्त्यावर वाघोलीपर्यंत सर्वाधिक गर्दी होती. एवढ्यावरच न थांबता पुढील प्रवासात देखील काही ठिकाणी वाहन चालकांना कोडींचा सामाना करावा लागला.एक्स्प्रेस वेप्रमाणेच गोव्याच्या दिशेने जाणारी वाहने सातारा रस्त्यावर खंबाटकी घाटात देखील अडकली. वाई, सातारा, महाबळेश्वर, पाचगणी, प्रतापगड या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीने सातारा रस्ता ब्लॉक झाला होता. असेच काहीसे चित्र इतर रस्त्यांवर देखील होते.

शहरात वाहतूक सुरळीत :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने शहरात आज वाहतुकीत बदल करण्यात आला होता. त्यामुळे पुणे स्टेशन आणि दांडेकर पूल भागात सकाळी आणि संध्याकाळी काही वेळ वगळता शहरात वाहतूक सुरळीत होती. सुटी असल्याने नोकरदारांची वाहने कमी प्रमाणात रस्त्यावर होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com