पुणे-सातारा महामार्गावर वाहतूक कोंडी; पाहा कोठे झालीय कोंडी?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

रविवारची सुट्टी आणि लग्न तिथीची तारीख असल्याने आज सकाळपासून पुणे-सातारा रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी आहे. त्यामुळे सकाळपासून येथील खेड-शिवापूर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

खेड-शिवापूर : पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर रविवारी सकाळपासून वाहनांच्या सुमारे दीड किलोमीटर रांगा लागल्या आहेत. टोल व्यवस्थापनाच्या भोंगळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे प्रवाशांना याठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा 

रविवारची सुट्टी आणि लग्न तिथीची तारीख असल्याने आज सकाळपासून पुणे-सातारा रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी आहे. त्यामुळे सकाळपासून येथील खेड-शिवापूर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या टोल नाक्यावर सुमारे दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. येथील वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी सुमारे वीस मिनिटे लागत आहेत. टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीत वेळ वाया जात असल्याने प्रवाशांना पुढे इच्छित स्थळी जाण्यासाठी उशीर होत आहे. त्यामुळे प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

भाजपची माघार; नाना पटोले विधानसभेचे बिनविरोध अध्यक्ष!

रविवारच्या सुट्टीमुळे टोल नाक्यावर होणारी गर्दी लक्षात घेऊन टोल प्रशासनाने कोणतेही वाहतुकीचे नियोजन केले नाही. त्यामुळे याठिकाणी प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

अजित पवारांनी केली विधानसभेत 'ही' चूक, वाचा काय म्हणाले...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic jams on the Pune-Satara highway

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: