सातारा रस्त्यावर वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

बिबवेवाडी - सातारा रस्त्यावर विकासकामे सुरू असल्यामुळे रस्ता वाहतुकीला अपुरा पडत असून, वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे किरकोळ अपघातातून वाहनचालकांची दररोज वाद होण्याचे प्रकार घडत आहेत. 

बिबवेवाडी - सातारा रस्त्यावर विकासकामे सुरू असल्यामुळे रस्ता वाहतुकीला अपुरा पडत असून, वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे किरकोळ अपघातातून वाहनचालकांची दररोज वाद होण्याचे प्रकार घडत आहेत. 

आदिनाथ सोसायटीसमोर रविवारी दुपारी चारचाकी व एका दुचाकी वाहनचालकाच्या भांडणाचे पर्यवसन मारामारीत होऊन रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. आदिनाथ सोसायटीच्या पुढे पंचमी हॉटेल चोकातून उजवीकडे आदिनाथ सोसायटी व महर्षीनगरमध्ये येण्यासाठी रस्त्यावर यू टर्नला बंदी असून, अनेक वाहनचालक हा नियम डावलून यू टर्न घेतात. त्यामुळे स्वारगेटच्या बाजूने येणाऱ्या वाहनांना धक्का लागणे, वाहन घासणे असे प्रकार घडतात. त्यातच स्वारगेटहून येणाऱ्या पीएमपीएलच्या बस बीआरटी मार्गात जाण्यासाठी पंचमी हॉटेल चौकातून मार्गात घुसतात. त्यामुळे साईबाबा मंदिर बसथांब्यावरून पीएमपीएलच्या बस उजवीकडे बीआरटी मार्गात जाण्यासाठी वळतात तेव्हा पाठीमागून येणाऱ्या वाहनांना रस्ता राहत नाही. बस बीआरटी मार्गात गेल्यावरच वाहनांना रस्ता मिळतो, तोपर्यंत रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन किरकोळ अपघात होतात.

Web Title: Traffic jams on satara roads

टॅग्स