गुढीपाडव्याच्या दिवशी सिंहगड किल्ल्यावरील वाहतूक पुर्णपणे बंद राहणार

गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे शनिवार दि. 2 एप्रिल 2022 रोजी सिंहगड किल्ल्यावरील वाहतूक सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत पुर्णपणे बंद असणार आहे.
Sinhgad Fort
Sinhgad FortSakal
Summary

गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे शनिवार दि. 2 एप्रिल 2022 रोजी सिंहगड किल्ल्यावरील वाहतूक सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत पुर्णपणे बंद असणार आहे.

किरकटवाडी - गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa) दिवशी म्हणजे शनिवार दि. 2 एप्रिल 2022 रोजी सिंहगड किल्ल्यावरील (Sinhgad Fort) वाहतूक (Transport) सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत पुर्णपणे बंद (Close) असणार आहे. लष्काराचे पुणे सदर्न कमांड मुख्यालय व इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'नरवीर तान्हाजी रन' उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी हा आदेश जारी केला आहे.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि सिंहगड किल्ला विजयाला 351 पूर्ण होत असल्याने भारतीय लष्कर व इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राजगड किल्ल्याच्या पायथ्यापासून सुरू होणाऱ्या या 'नरवीर तान्हाजी रन' उपक्रमाचा समारोप सिंहगड किल्ल्यावरील नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या स्मारकाजवळ होणार आहे. यामध्ये एकूण 351 व्यक्तींचा सहभाग असणार आहे. त्यापैकी 200 लष्करी सेवेतील तर 151 सामान्य नागरिक असणार आहेत.

सदर कार्यक्रमानिमित्त लष्करातील वरिष्ठ अधिकारी व काही महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. रुग्णवाहिका, लष्कराच्या ट्रक व अधिकाऱ्यांची वाहणे येणार असल्याने त्यावेळी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सिंहगड किल्ल्यावर जाणारी व येणारी वाहतूक 2 एप्रिल रोजी सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे आहे. त्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी जारी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com