वाहतूक पोलिसांची ११९ जणांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

पिंपरी - दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या ११९ तळीरामांवर पोलिसांनी सोमवारी (ता. ३१) कारवाई करत त्यांच्यावर खटले भरले. नऊ विभागांच्या वतीने तीन दिवसांपासूनच धडक कारवाई सुरू केली होती. रविवारी (ता. ३०) शहरात १२७, सोमवारी ११९ जणांवर कारवाई केली. 

हिंजवडी वाहतूक विभागाने सोमवारी (ता. ३१) ५३ तर तीन दिवसांत एकूण ७३ तळीरामांवर कारवाई केली. दिघी वाहतूक विभागाला मात्र, ब्रीथ एनालाइजर मशिन उपलब्ध झाली नसल्याचे एकही कारवाई केली नाही.  

मोटार वाहन अधिनियमानुसार दारू पिऊन खटला भरलेल्या वाहनचालकाचा वाहन परवाना तीन महिने किंवा कायमस्वरूपी रद्द होऊ शकते. पाच ते दहा हजार रुपये दंड तसेच एक महिन्याच्या कारावासाची साधी शिक्षा न्यायालय करू शकते, असे हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी सांगितले.

३१ डिसेंबरची वाहतूक विभागानुसार कारवाई - हिंजवडी - ५३, भोसरी - १९, 
पिंपरी - १६, चिंचवड - १०, देहूरोड - ९, निगडी - ६, चाकण - ३, तळवडे - ३.

Web Title: Traffic police action on 11 people in pcmc

टॅग्स