नियम सर्वांना लागू पडे! पुणे वाहतूक पोलिसांची नियम मोडणाऱ्या PMT बसवरही कारवाई | Pune Traffic Police | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Traffic Police

Pune Traffic Police : नियम सर्वांना लागू पडे! पुणे वाहतूक पोलिसांची नियम मोडणाऱ्या PMT बसवरही कारवाई

पुणे : पुण्याच्या वाहतूक कोंडीमुळे वारंवार नागरीक तक्रारी करत असतात. बेशिस्तपणे वाहने चालवणे, सिग्नल तोडणे, कोणतेही वाहतुकीचे नियम न पाळणे अशा नागरिकांमुळे वाहतुकीच्या अनेक समस्या निर्माण होतात. तर अशा "माठां"विरोधात पुणे वाहतूक पोलिसांनी पावले उचलली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे.

पुणे वाहतूक पोलिसांनी "कोणे हा माठ" या नावाने अभियान सुरू केलं असून वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या नागरिकांचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे टिपलेले फोटो अधिकृत ट्वीटर हँडलवर पोस्ट करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी आता बेशिस्तपणे वाहने चालवणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई केली जात आहे.

दरम्यान, वाहतुकीचा नियम सर्वांना लागू पडतो. त्यामुळे पीएमपीएमएल बसवरही कारवाई करण्यात येत आहे. तर सिग्नल लागल्यावर पांढऱ्या पट्टीच्या समोर येणाऱ्या बसचे फोटो शेअर करत त्या PMPML बसवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पुणे वाहतूक पोलिसांच्या अधिकृत ट्वीटरवरून देण्यात आली आहे.

तर फूटपाथवरून गाडी चालवणाऱ्या, नियम तोडूनही इतर नागरिकांवर दमदाटी करणाऱ्या चालकांवरही कारवाई करण्यात येत आहे. ट्वीटरवर पोलिसांच्या अकाऊंटला टॅग करून नियम तोडणाऱ्यांविरोधात तक्रार केली तरीही पोलिसांकडून अशा बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यात येते. पोलिसांच्या या अभियानामुळे बेशिस्त वाहतुकीस चाप बसेल अशी अपेक्षा आहे.