नागरिकच होताहेत वाहतूक पोलिस...

ज्ञानेश्वर भंडारे
शुक्रवार, 18 मे 2018

वाल्हेकरवाडी : रावेत चौकातील बंद असणारे सिग्नल, वाहतूक कोंडी, वाहतूक पोलिसांचे दर्शन दुर्मिळ यावर उपाय म्हणून रावेतकर स्वतःच वाहतूक पोलिसांची भूमिका बजावत वाहतूक सुरळीत करत आहेत. रावेत चा मुख्य बी आर टी रस्ता तसेच मुंबई-पुणे द्वितगती मार्गाला जोडणारा जवळचा रस्ता, शहराचे आकर्षण बास्केट ब्रिज, हिंजवडी पासून असणारे उपनगर म्हणून या रस्त्यावर जास्त प्रमाणात वाहनांची ये-जा असते.

अंतर्गत रस्त्याचे रखडलेली कामे त्यामुळे या रस्त्यावरूनच स्थानिक नागरिकांची ये जा असते. पण बंद असणारे दिवे, वाहतूक कोंडी यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच यासाठी देहूरोड पोलिस स्टेशनचे उंबरठे झिजवले पण देहूरोड पोलिसांनी अपुऱ्या कर्मचाऱ्यांचे कारण पुढे करत प्रत्येक वेळी टाळत आले. यावर उपाय म्हणून शेवटी रावेत करांनी वाहतूक कंट्रोल कमिटी ची स्थापना करून स्वतः नागरिक चौकात हातात दांडू व शिट्टी घेऊन उभे राहतात. यामध्ये प्राजक्ता रुद्रवार, गणेश बोरा, केतकी नायडू, गणेश दत्तात्रय सोनटक्के, अमोल दामले, अन्वर मुलानी, विशाल भोंडवे, शांताराम माठे, संभाजी भोंडवे, पौर्णिमा पालेकर, राहुल भोंडवे सहभागी आहेत.

अपुऱ्या संख्याबळामुळे आम्ही तिथे वाहतूक पोलिस पुरवू शकत नाही, नागरिकांची संकल्पना चांगली आहे, आम्ही त्यांना पोलिस मित्रचे कार्ड व युनिफॉर्म पुरविणार आहोत, अत्यावश्यक सेवेच्या वेळी आमचे कर्मचारी आम्ही पाठवतो.
- ए. एम. लांडगे, पोलिस उपनिरीक्षक

रावेत चोकतील वाहतुकीचा प्रश्नःन सोडवण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करण्याबरोबर सायकल शेअरिंग, हिंजवडी ,आकुर्डी स्टेशन पर्यंत शटल बस सर्विस आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करण्यात यावी. तसेच रावेत वाल्हेकरवाडी येथील प्रलंबित रस्ते व्हायला पाहिजेत.
- गणेश बोरा, वाहतूक कंट्रोल कमिटी

वाहतुकीची समस्या ही दररोज भेडसावत असल्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून हा उपाय करतोय, प्रत्येक शहरवासीयांनी आपापल्या जवळच्या चौकात पोलिस मित्रांची भूमिका बजावली तर वाहतूक समस्या आपोआप सुटेल.
- प्राजक्ता रूद्रावर, वाहतूक कंट्रोल कमिटी

Web Title: Traffic police are the citizens ...