पुण्यात वाहतूक नियम पाळा! चहा मिळेल..!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे पालन आणि हेल्मेट वापर करणाऱ्या वाहनचालकांना प्रोत्सहन देण्यासाठी जागतिक चहा दिनाचे औचित्य साधुन पोलिसांची वाहतूक शाखा व येवले अमृततुल्य यांच्यावतीने शनिवारी व रविवारी आगल्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. 

पुणे : वाहतुकीच्या नियमांचे पालन करणाऱ्या, हेल्मेटचा वापर करणाऱ्या वाहनचालकांचे वाहतूक पोलिसांकडुन गरमागरम चहा पाजुन तोंड गोड करण्यात आले. नियमाचे पालन करणाऱ्या दहा हजार नागरीकांना आज (शनिवार) आणि उद्या (रविवार) मोफत चहाचे कूपन देण्यात येणार आहे.

नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे पालन आणि हेल्मेट वापर करणाऱ्या वाहनचालकांना प्रोत्सहन देण्यासाठी जागतिक चहा दिनाचे औचित्य साधुन पोलिसांची वाहतूक शाखा व येवले अमृततुल्य यांच्यावतीने शनिवारी व रविवारी आगल्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. 

शनिवारी सकाळी आठ वाजता बालगंधर्व रंगमंदीराजवलील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात वाहतुक नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकास चहाचे कुपन देऊन या उपक्रमाची प्रातिनिधिक स्वरुपात सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी कळविली.

Web Title: traffic police celebrate world tea day in Pune