वाहतूक पोलिसांनीच केले अतिक्रमण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

पुणे : वाहतूक पोलिसांनी खंडुजीबाबा चौकातील एका जाहिरात फलकावरच 'फ्लेक्‍स' लावून अतिक्रमण केले आहे. याबाबत एका जाहिरात संस्थेने तक्रार केली आहे.
कायदा आणि नियमांची अंमलबजावणी करणाऱ्यांमध्ये वाहतूक पोलिस हा महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्याकडूनच अशाप्रकारचे बेकायदेशीर कृत्य झाले आहे. "कोहिनूर आर्टस' या जाहिरात संस्थेचे बाळासाहेब गांजवे यांनी हा प्रकार समोर आणला आहे. त्यांच्या संस्थेचा खंडुजीबाबा चौकात एक जाहिरात फलक आहे. त्यांनी महापालिकेची परवानगी घेऊन खासगी जागेत 40 बाय 20 फूट या आकाराचे दोन फलक उभे केले आहेत.

महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडे त्याचे प्रत्येकी 1 लाख 77 हजार 600 रुपये इतके शुल्कही ते नियमित जमा करतात. जागामालकासही ते भाडे देत आहेत. यासाठी प्रतियुनिट 21 रुपये दराने वीजबिलही भरत आहेत. आपल्या ग्राहकांची जाहिरात या फलकांवर ते लावत असतात; परंतु या फलकावर वाहतूक पोलिसांनी "फ्लेक्‍स' लावला आहे. यासाठी आमची परवानगी घेतली नाही, त्याची कल्पनाही दिली नाही, असे गांजवे यांनी कळविले आहे.

याबाबत गांजवे यांनी पोलिस आयुक्त, वाहतूक पोलिस यांना पत्र दिले आहे. या जाहिरात फलकाचे प्रतिदिन साडेपाच हजार रुपये इतके भाडे संस्थेला मिळत असून, वाहतूक पोलिस जितके दिवस जाहिरात फलकावर त्यांचा "फ्लेक्‍स' ठेवतील तितक्‍या दिवसांचे भाडे त्यांना द्यावे लागेल आणि ते न दिल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी या पत्रात दिला आहे.

Web Title: traffic police enchroach