वाहतूक पोलिस करणार प्रथमोपचार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

पुणे - अपघाताच्या अनेक घटना शहरात दररोज घडतात. या अपघातग्रस्तांना तातडीने प्रथमोपचार मिळणे गरजेचे असते. मात्र, अनेकदा अशी मदत मिळतेच असे नाही. हे लक्षात घेऊन आता खुद्द पोलिसांच्या वाहतूक शाखेनेच आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्याचे ठरविले आहे.

अपघाताच्या घटनांमध्ये सर्वसामान्यांबरोबरच पोलिसांकडूनही माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात पुढे करण्यात येतो; परंतु जखमी व्यक्तीच्या वेदना कमी करण्यासाठी, अथवा अन्य उपायाबाबत शास्त्रीय ज्ञानाचा त्यांच्याकडे अभाव असतो. त्यामुळे पोलिसांना इच्छा असूनही काही करता येत नाही. 

वाहतूक पोलिस विभागाने हीच बाब हेरून वाहतूक पोलिसांनाच प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्याचे ठरविले आहे. 

आमच्याकडे वैद्यकीय ज्ञान नसल्याने अपघातातील जखमी व्यक्‍तीच्या वेदना कमी करता येत नाहीत. प्रथमोपचाराचे प्रशिक्षण मिळाल्यास वेदना कमी करण्यासाठी प्रयत्न करता येतीलच, त्याशिवाय जीव वाचविण्यासही मदत होईल.
 - नामदेव गायकवाड, पोलिस कर्मचारी, खडक वाहतूक विभाग.

अनेकदा पोलिस कर्मचारी अपघाताच्या ठिकाणी पहिल्यांदा येतात. त्यामुळे त्यांनाही प्रथमोपचाराचे प्रशिक्षण मिळाल्यास अपघातग्रस्तांना मदत होऊ शकेल.
 - केदार तिखे, नागरिक

हे करता येईल
श्‍वासोच्छ्वास देणे
मोठ्या प्रमाणात होणारा रक्तस्राव थांबविणे 
मोठी दुखापत होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे
रुग्णाला स्ट्रेचरद्वारे व्यवस्थित रुग्णवाहिकेत ठेवणे
फ्रॅक्‍चर असल्यास काळजीपूर्वक रुग्णालयात पोचविणे.

Web Title: Traffic police first aid