चारचाकी वाहनाच्या धडकेने वाहतूक पोलिस जखमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

बिबवेवाडी : स्वामी विवेकानंद मार्गावर कर्तव्य बजावताना वाहतूक पोलिस कर्मचारी चारचाकी वाहनाच्या धडकेने गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बाळासाहेब दगडे असे या वाहतूक पोलिसाचे नाव आहे.

विवेकानंद मार्गावरील बिबवेवाडी कोंढवा रस्ता चौकात वाहतूक सिग्नलचे नियमन करत असताना बिबवेवाडी कडून कोंढव्याच्या दिशेने जाणारी ट्रँव्हल्स कंपनीची स्विफ्ट डिज़ायर कार क्रं. MH12KN1446 घेऊन चालक दत्तात्रय जाधव भरधाव वेगात चालला होता. उजवीकडे वळताना चौकातील वाहतूक पोलिस त्याला दिसला नाही. त्यामुळे त्याने दगडे यांना जबर धडक दिली. धडकेत दगडे यांचे डोके कारच्या पुढील काचेवर आदळले. त्यामुळे कारची काच फुटली असून, दगडेंच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झालेली आहे. पोलिसांनी दत्तात्रय जाधवला अटक केली आहे.

Web Title: Traffic police injured by the vehicle