पुणे :..म्हणून झाले वाहतूक पोलिसाचे निलंबन

पुणे :..म्हणून झाले वाहतूक पोलिसाचे निलंबन

पुणे : वाहनचालकांच्या जप्त वाहनांच्या दंडाची रक्कम वसुल करण्यासाठी कंत्राटी कामगाराकडून ई-चलन मशीन वापरल्याच्या प्रकरणाची वाहतुक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली. कंत्राटी कामगाराच्या हातात ई-चलन मशीन देणाऱ्या वाहतूक पोलिसाचे निलंबन करण्यात आले आहे. या कारवाईद्वारे कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या वाहतूक शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा अप्रत्यक्ष देण्यात आला आहे. 

सहकारनगर वाहतुक विभागातील "नो पार्किंग'मध्ये असणारी वाहने टेम्पोद्वारे (टोइंग व्हॅन) उचलून सहकारनगर व भारती विद्यापीठ वाहतुक शाखेच्या कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत ठेवण्यात आली होती. त्यावेळी दंड झालेल्या वाहनचालकांकडून संबंधीत टोईंग व्हॅनवरील कामगार ई-चलन मशिनद्वारे दंड वसुली करत असल्याचे उघड झाले होते. दरम्यान, हा प्रकार पाहणाऱ्या व त्याचे व्हिडीओ रेकॉर्डींग करणाऱ्या प्रभाकर सुर्यवंशी या नागरिकांशी संबंधित कंत्राटी कामगाराने उद्दामपणे वागत त्यांना दमबाजी केल्याचे चित्रीकरणामध्ये आढळले होते. याबाबतचे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. तसेच या घटनेतील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरीकांकडून वाहतुक पोलिसांच्या कामगिरीवर टिका करण्यात आली होती. 

दरम्यान, वाहतुक शाखेचे अपर पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे व पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली. डॉ.शिंदे यांनी घटनेची चौकशी करुन दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार, त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यावेळी सहकानगर वाहतुक विभागातील कर्मचारी संजय कोंडे यांनी त्यांच्याकडील ई-चलन मशीन संबंधित कामगाराकडे दिल्याचे आढळून आले. त्यानुसार, कोंडे यांनी कर्तव्यात कसूर केला, त्यामुळे वाहतुक पोलिसांची प्रतिमा जनमानसात मलिन झाल्याप्रकरणी डॉ.शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलिस उपायुक्त अक्कानवरु यांनी पोलिस कर्मचारी कोंडे यांचे निलंबन केले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com