Viral Video : पुण्यात ट्राफिक पोलिसांनी घेतली लाच; घटना कॅमेऱ्यात कैद, 2 कर्मचारी निलंबीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : पुण्यात ट्राफिक पोलिसांनी घेतली लाच; घटना कॅमेऱ्यात कैद, 2 कर्मचारी निलंबीत

पुणे : पुणे ट्राफिक पोलिसांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ते एका दुचाकीस्वाराकडून लाच घेताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन ट्राफिक पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे.

दरम्यान, वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई न करता त्यांच्याकडून पैसे स्वीकारत असल्याच्या संशयावरून वाहतूक शाखेतील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना बुधवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी ही कारवाई केली.

अनेकदा प्रवास करताना वाहतूक पोलिसांनी थांबवल्यावर लाच घेतली जात असल्याच्या तक्रारी येत असतात. या अगोदरही असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. पण पुण्यात या कर्मचाऱ्यांना निलंबीत करून वाहतूक पोलीस शाखेने जनतेच्या मनातील भिती काढून टाकली आहे.