पुणेकर कोंडीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

पुणे - पाऊस, नदीपात्रातील रस्त्यावर आलेले पुराचे पाणी, रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे, बंद वाहतूक नियंत्रक दिवे आणि मार्गातच बंद पडलेल्या पीएमपी बस... यामुळे पुण्यातील उपनगरांसह शहरातील प्रमुख रस्त्यांवर मंगळवारी प्रचंड वाहतूक कोंडी झाली. तास-दीड तास प्रवास करूनही पुणेकर वेळेत कामाच्या ठिकाणी पोचू शकले नसल्याचे चित्र सकाळी दिसले. 

शहरात सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये विसर्ग सुरू आहे. या पुरामुळे नदीपात्रातील रस्त्यावर पाणी आले आहे. त्याचा थेट परिणाम कोथरूड, वारजे, सिंहगड रस्ता येथून नदीमार्गे कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या पुणेकरांवर झाला. नदीपात्रातील रस्ता बंद झाल्याने सर्व वाहतूक कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता; तसेच यादरम्यानच्या उपरस्त्यांवरून सुरू झाली. यातच वाहतूक नियंत्रक दिवे बंद झाल्याने रस्त्या-रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. 

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसर, मेहेंदळे गॅरेज परिसर, धोंडूमामा साठे होमिओपॅथिक महाविद्यालयापासून झालेली वाहतूक कोंडी डेक्कनपर्यंत कायम होती. कर्वे रस्ता, घोले रस्ता, प्रभात रस्ता, कुमठेकर रस्ता या भागातही कोंडीतून मार्ग काढत वाहनचालक कामाच्या ठिकाणी पोचण्यासाठी धडपड करत होते. शहरातील हे चित्र दुपारी दीड वाजेपर्यंत कायम होते.

Web Title: traffic in pune rain water