पुणे - रेल्वे फाटकावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण

संदिप जगदाळे
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

हडपसर (पुणे) : पुणे-मिरज मार्गावर काळेपडळ येथील रेल्वे फाटकावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यातच अवजड वाहनांमुळेच वाहतुकीची कोंडीत भर पडत आहे. हे फाटक रूंद करावे तसेच या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल उभारावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महापालिकेने देखील या चौकात होणाऱ्या अतिक्रमणास लगाम घालणे आवश्यक आहे. 

हडपसर (पुणे) : पुणे-मिरज मार्गावर काळेपडळ येथील रेल्वे फाटकावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यातच अवजड वाहनांमुळेच वाहतुकीची कोंडीत भर पडत आहे. हे फाटक रूंद करावे तसेच या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल उभारावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महापालिकेने देखील या चौकात होणाऱ्या अतिक्रमणास लगाम घालणे आवश्यक आहे. 

या भागात मोठया प्रमाणात नागरिकरण झाले आहे. त्यामुळे वाहनांची संख्या देखील वाढली आहे. हे फाटक दिवसातून अनेकदा बंद होते. फाटक उघडल्यानंतर वाहने बेशिस्तीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यात हे फाटक व दुतर्फा असलेले रस्ते अरूंद आहेत. या भागात पाण्याचे टॅंकर व जड वाहने मोठया प्रमाणात येजा करतात. त्यामुळे फाटकावर तांसतास वाहतूक कोंडी होते. यातून अनेकदा वाहन चालकांमध्ये वादविवाद होतात. याठिकाणी वाहतूक पोलिस नियुक्त केले असतात. मात्र त्यांनाही या बेशिस्त वाहन चालक व अरूंद रस्त्यांमुळे वाहतूक नियंत्रण करणे अशक्य होते.

नागरिक सविता जगताप म्हणाल्या, कामगार, शालेय विद्यार्थी यांना वांरवार फाटक बंद असल्यामुळे उशीर होतो. फाटकावर वाहतूक कोंडी होत असल्याने प्रदूषण देखील मोठया प्रमाणात होते. त्यामुळे याठिकाणी प्रशासनाने रेल्वे उड्डाणपूल बांधणे आवश्यक आहे. 

हडपसर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस नरिक्षक जे. डी. कळसकर म्हणाले, महापालिकेचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या समवेत आम्ही बैठक घेतली. काळेपडळ फाटकाच्या दुतर्फा रस्ता रूंदीकरण करावे अथवा याठिकाणी ग्रेडशेपरेटर अथवा रेल्वे उड्डाणपूल उभारावा अशी सूचना केली आहे. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी आमचे कर्मचारी नियुक्त केले आहेत. मात्र रस्ते अरूंद असल्याने वाहतूक ठप्प होते. ससाणेनगर रेल्वे फाटक येथे देखील भुयारी मार्ग अथवा रेल्वे उड्डाणपूल झाल्यास या दोन्ही ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही. 

Web Title: traffic on railway gate barrier to citizens in hadapsar pune