नियम पाळा; ‘मनःपूर्वक आभार’ मिळवा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

मुंढवा - बंडगार्डन वाहतूक विभागाच्या शाखेतर्फे वाहतूक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. ज्या दुचाकी, तीनचाकी व चारचाकी चालकांनी वाहतुकीचे नियम पाळले, अशांच्या वाहनांवर मनःपूर्वक आभाराचे स्टिकर वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त देविदास 
पाटील यांच्या हस्ते लावण्यात आले.  

मुंढवा - बंडगार्डन वाहतूक विभागाच्या शाखेतर्फे वाहतूक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. ज्या दुचाकी, तीनचाकी व चारचाकी चालकांनी वाहतुकीचे नियम पाळले, अशांच्या वाहनांवर मनःपूर्वक आभाराचे स्टिकर वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त देविदास 
पाटील यांच्या हस्ते लावण्यात आले.  

चौकाचौकातील सीसीटीव्हीद्वारे वाहनांवर नजर ठेवली जात आहे. वाहन चालविताना पादचाऱ्यांचा आदर करा, बाहुबली हेल्मेट घालतो तर आपण का लाजतो. तुमच्या कुटुंबासाठी हेल्मेटचा वापर करा. पोलिस कर्मचारी व अधिकारी ज्या सूचना देतील त्यांचे प्रत्येक वाहनचालकाने काटेकोरपणे पालन करून वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन वाहतूक पोलिस वेळोवेळी करतात. जे नियम पाळतात त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देण्यासाठी वाहतूक विभागाने मनःपूर्वक आभाराचे ४७० स्टिकर लावले.    

सहायक पोलिस आयुक्त देविदास पाटील म्हणाले, ‘पुण्याची लोकसंख्या सुमारे ७० लाखांचा टप्पा ओलांडून पुढे गेली आहे. शहरातील वाहनचालकांना स्वयंशिस्तीचे धडे देण्यासाठी विविध स्तरांवर वाहतूक विभाग प्रयत्न करीत आहे. शहराच्या सुरक्षित वाहतूक प्रक्रियेत वाहनचालकांबरोबरच लोकप्रतिनिधी, प्रशासनाबरोबरच माध्यमे आणि नागरिकांनीही सकारात्मक भूमिका बजावण्याची गरज आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल व वाहतूक सुरळीत होईल.’ 

पोलिस उपनिरीक्षक संतोष गोरे म्हणाले, ‘आपण वाहतुकीचे नियम पाळतो का ? याविषयी आपण स्वतःला विचारून नियम पाळण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. केवळ उपायांची चर्चा करण्यापुरते मर्यादित न ठेवता कृतिशील चळवळ होणे आवश्‍यक आहे. या चळवळीत आपण सर्वांनी भाग घ्यावा. आपणच वाहतुकीचे नियम मोडून त्याबद्दल कधी वाहतूक पोलिसांना दोष देतो; परंतु आपली जबाबदारी काय आहे? वाहतुकीचे प्राथमिक नियम आपण सर्वच जण पाळतो का? याची जाणीव प्रत्येक चालकांना होणे गरजेचे आहे.’

Web Title: traffic rule police