शिक्रापूर पोलिसांनी "पुणे'ला दिला न्याय

Board
Board

शिक्रापूर (पुणे) : "वाचून दाखवा आणि एक लाख ते एक कोटीचे बक्षीस मिळवा' या सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजची दखल शिक्रापूर पोलिसांनी घेतली.

रस्ता दुभाजकासाठी शिक्रापूर पोलिसांकडून पुणे-नगर महामार्गावर काही फलक लावलेले आहेत. त्यातील एका फलकावर "शिक्रापूर पोलिस स्टेशन पुणे ग्रामीण' हे लिहिताना "पुणे' हा शब्द "पणुे' असा लिहिला गेला होता. ते वाचणे एकाही मराठी माणसालाच सोडा मराठी भाषा तज्ज्ञालाही शक्‍य झाले नसते. गुरुवारी सकाळपासूनच हा फलक सोशल मीडियात झळकला आणि दुपारनंतर हे वाचून दाखविणाऱ्यांना एक लाख ते एक कोटीपर्यंतच्या बक्षिसांची खैरातही झाली. आता हा मजेशीर फलक आणि त्यावर शिक्रापूर पोलिसांचा उल्लेख झाल्याने शिक्रापूर पोलिसांनी तातडीने दखल घेतली आणि हा फलक महामार्गावरील तब्बल 150 फलकांमधून शोधून काढला. हा फलक सापडला तो कोरेगाव भीमा येथील गणेश भुवन हॉटेल चौकात आणि फलकावरील पुण्याचा "पु'मधला उकार नेमका जागेवर म्हणजेच "प'खाली आणून हा फलक पुन्हा रात्रीत जागेवर बसविला. एखाद्या पेंटरकडून चूक झाल्यावर ते किती व्हायरल होऊ शकते याचा मजेशीर अनुभव शिक्रापूर पोलिसांना आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com