महिलांना वाहन चालविण्याचे पालिकेतर्फे प्रशिक्षण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

पिंपरी - ‘‘महिलांना स्वयंरोजगार निर्माण व्हावा, यासाठी महापालिका हद्दीतील किमान आठवी उत्तीर्ण महिलांना हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर गरजू महिलांना वाहन खरेदीसाठी महापालिकेमार्फत अनुदानाची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. मोरवाडी आयटीआयमार्फत ऑनलाइन परीक्षेचा सराव करून घेण्यात येणार आहे,’’ अशी माहिती महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर यांनी दिली. 

महिलांना चारचाकी हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण महापालिकेतर्फे दिले जाणार आहे. प्रशिक्षण वर्गाचे उद्‌घाटन भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते महापालिका भवनाच्या आवारात झाले. या प्रशिक्षणासाठी तापकीर यांनी पाठपुरावा केला होता. महापालिका हद्दीतील आठवी पास महिलांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी एक लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिलांसाठी कोणतेही सहभाग शुल्क आकारले जाणार नाही. एक लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांकडून केवळ २५ टक्के सहभाग शुल्क आकारले जाणार आहे. विधवा महिलांसाठी सहभाग शुल्क आकारले जाणार नाही. वयाची २२ वर्षे पूर्ण केलेल्या महिला या योजनेत सहभागी होऊ शकतात. वाहन प्रशिक्षण देणेकामी महापालिकेने दोन मोटार प्रशिक्षण संस्थांची नेमणूक केलेली आहे. योजनेतील सहभागी महिलांना वाहन परवाना मिळण्यासाठी आवश्‍यक वैद्यकीय दाखला त्यांच्या निवासाच्या जवळील महापालिका दवाखान्यातून देण्यात येणार आहे. 

प्रशिक्षण वर्गाच्या उद्‌घाटनप्रसंगी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, पक्षनेते एकनाथ पवार, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, सीमा सावळे, नगरसेवक हर्षल ढोरे, नगरसेविका आशा धायगुडे-शेडगे, निर्मला कुटे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, सहायक आयुक्त स्मिता झगडे, अण्णा बोदडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले उपस्थित होते.

Web Title: Training by the corporation for women driving