वन्यजीव सप्ताह निमित्ताने वनकर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

वन्यजीव सप्ताह निमित्ताने वनकर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

जुन्नर : मानव बिबट संघर्ष कमी होण्यासाठी जनजागृती महत्वाची आहे. असे प्रतिपादन माणिकडोह ता. जुन्नर येथील बिबट निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांनी येथे केले. वन्य जीव सप्ताहाचे निमित्ताने माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रांत जुन्नर वनविभगाचे वनरक्षक, वनपाल यांना प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

जुन्नरचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रजोत पालवे, वनपाल कृष्णा दिघे  तसेच वनपाल व वनरक्षक उपस्थित होते. बिबट्याचे जीवशास्त्र सांगताना डॉ. देशमुख म्हणाले, बिबटयाचे जीवनचक्र 15 ते 17 वर्षाचे असते. गर्भधारणा कालावधी 105 दिवसांचा असतो. मादी बिबट एकावेळी 1 ते 4 बछड्यानं जन्म देते. हा मांजरकुळातील निशाचर प्राणी आहे. 

यावेळी त्यांनी बिबट रेस्क्यूच्या वेळी कोणती दक्षता घ्यावी हे समजावून सांगितले. तसेच बिबट पुनर्वसन करते वेळी कोणत्या उपाययोजना असाव्यात याविषयी माहिती दिली. याबरोबर बिबट मानव संघर्ष कमी करून बिबट्या सोबत सहजीवन कसे करता येईल याविषयी मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com