पुणे जिल्ह्यातील 4 सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

police
police

लोणी काळभोर (पुणे) : सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या चार अधिकार्‍यांच्या बदल्या जिल्हाअंतर्गत करण्यात आल्या असून, वालचंदनगर पोलिस ठाण्यात अधिकारी म्हणून दिलीप पवार यांची तर भिगवण पोलिस ठाण्याचे अधिकारी म्हणून जीवन माने यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केली.

वालचंदनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी कानगुडे व भिगवणचे महेश गव्हाण यांची पोलिस निरीक्षक म्हणून बढती झाल्याने वरील दोन्ही पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या,यामुळे संदीप पाटील यांनी मंगळवारी (ता. 11) रात्री चार अधिकार्‍यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या केल्या.

लोणी काळभोर येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले दिलीप गोविंद पवार यांची वालचंदनगरला तर सोमनाथ विष्णु लांडे यांची वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील जीवन हिंदुराव माने यांची भिगवण तर यवत येथील विनायक नामदेव देवकर यांची वेल्हा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com