पुणे विभागातील 34 उपजिल्हाधिकारी अन् 50 तहसिलदारांच्या बदल्या

Slide2.jpg
Slide2.jpg

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने पुणे विभागातील 34 उपजिल्हाधिकारी आणि 50 तहसिलदार यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने हवेलीच्या प्रांताधिकारीपदी सचिन बारावकर, जुन्नर-आंबेगाव प्रातांधिकारीपदी संजय पाटील, खेडच्या प्रातांधिकारी संजय तेली यांच्या नियुक्तीचे आदेश शासनाने काढले आहेत.
 
मागील अनेक दिवसांपासून महसूल खात्यामध्ये बदलीच्या चर्चा सुरू होती. मर्जीतील ठिकाणी बदली मिळावी, यासाठी अनेक अधिकाऱ्यांनी राजकीय फिल्डींग देखील लावली होती. अखेर आज राज्य सरकारकडून बदलीचे आदेश जारी करण्यात आले. जिल्ह्यात सलग सहा वर्षे सेवा, एकाच पदावर तीन वर्षे सेवा अथवा स्व जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रामुख्याने बदल्या केल्या आहेत. 

उपजिल्हाधिकारी यांचे नाव कसांत नेमणुकीचे ठिकाण पुढीलप्रमाणे-
विद्युत वरखेडकर (महसूल शाखा सातारा), स्नेहल बर्गे (विभागीय आयुक्त कार्यालय), संजय आसवले (भूसंपादन अधिकारी सातारा), प्रमोद गायकवाड (उपविभागीय अधिकारी दौंड), उद्‌यसिंह भोसले (उपविभागीय अधिकारी मंगळवेढा), अजय पवार (जिल्हा पुरवठा अधिकारी पुणे) , आरती भोसले (भूसंपादन अधिकारी पुणे), ज्योती कदम (उपविभागीय अधिकारी माढा), अमृत नाटेकर (राजशिष्ट्राचार पुणे), श्रीमंत पाटोळे (भूसंपादन अधिकारी पुणे), 

बदली झालेल्या तहसिलरांची नावे कंसात नियुक्तीचे ठिकाण पुढीलप्रमाणे - 
प्रल्हाद हिरामणी (महसूल शाखा विभागीय आयुक्त कार्यालय), विवेक जाधव (महसूल शाखा पुणे), विजय पाटील (तहसिलदार बारामती), अमिता तळेकर (सहाय्यक पुरवठा अधिकारी), गीतांजली शिर्के (तहसिलदार , जिल्हाधिकारी कार्यालय), डी.एस.कुंभार (निवडणुक शाखा सोलापूर), गीता गायकवाड (अपर तहसिलदार पिंपरी चिंचवड), गुरू बिराजदार (तहसिलदार शिरूर), तृप्ती कोलते (तहसिलदार पुणे शहर), रणजित भोसले (तहसिलदार वाई), 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com