निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती विभागातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती विभागातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

बारामती - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती विभागातील पोलिस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत.

बारामती विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांची बीडचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली असून, त्यांच्या जागी जयंत मीना हे बारामतीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून रुजू होणार आहेत.

दरम्यान बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांचीही पौड पोलिस ठाण्यात बदली झाली असून, कोल्हापूरचे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील हे बारामती शहराचे पोलिस निरीक्षक म्हणून रुजू होणार आहेत.

बारामती शहर पोलिस ठाण्या अंतर्गत वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांचीही बदली झाली असून त्यांच्या जागी मात्र अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com