धायरीत ट्रान्स्फॉर्मर पडला ओढ्यात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

पुणे - धायरी येथील बेनकर वस्ती येथे ओढ्याकाठी बसविण्यात आलेल्या २०० केव्हीएचा ट्रान्स्फाॅर्मर चौथरा वाहून गेल्यामुळे ओढ्यात पडल्याची घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

बेनकर वस्तीमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाकडून चार इमारतींचे बांधकाम सुरू आहे. ट्रान्स्फॉर्मर बसविण्यासाठी महावितरणकडून या बांधकाम व्यावसायिकाला जागा मागण्यात आली. मात्र हावितरणच्या अधिकाऱ्यांनी ओढ्याच्या काठी असलेल्या सरकारी जागेत चौथरा उभा करून ट्रान्स्फॉर्मर बसविला. 

ओढ्याच्या काठावर ट्रान्स्फाॅर्मर बसविण्यात आल्यामुळे सोमवारी (ता. २५) झालेल्या पावसात चौथरा वाहून गेला. त्यामुळे ट्रान्स्फॉर्मर ओढ्यात पडला. तो पडला त्या वेळी त्यातून वीजपुरवठा सुरू होता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. वीजपुरवठा पाण्यात उतरला असता, तर मोठी दुर्घटना घडली असती, असे स्थानिकांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच तो ट्रान्स्फॉर्मर सरळ करण्यात आला. तेथे कोणीही जाऊ नये, यासाठी कर्मचारीदेखील उभे केल्याचे रहिवाशांनी सांगितले. 

ट्रान्स्फॉर्मर बसवल्यानंतर पाहणी करून वीजपुरवठा सुरू करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचे विद्युत निरीक्षक परवानगी देतात. जागा चुकीची असल्यास परवानगी देत नाहीत. त्यामुळे या प्रकरणात परवानगी दिली कशी, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. विद्युत निरीक्षक नितीन पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

बांधकाम व्यावसायिक आणि खासगी ठेकेदाराने हा ट्रान्स्फॉर्मर बसविला आहे. चौकशीनंतर दोषींवर कारवाई करू.
- सायस दराडे, कार्यकारी अभियंता, पर्वती विभाग

Web Title: transformer fell into the dump