Video : तृतीयपंथी चांदणी म्हणतेय, सत्ता आमच्या हातात द्या, सर्वांना सुतासारखं सरळ करू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

तृतीयपंथी चांदणीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.'' निवडणुका होऊन 26 दिवस झाले तरी राज्याला मुख्यमंत्री मिळत नाही, राज्याचे राज्यपाल नागपूरवाल्यांचे  ऐकतायेत का, राष्ट्रपती गुजरातवाल्यांचे ऐकतायेत? असा आम्हाला प्रश्न पडला आहे. सरकार आमच्या ताब्यात द्या, सर्वांना सुता सारखं सरळ करू.''अशी आक्रमक भूमिका तृतीयपंथी चांदणी यांनी व्हिडिओत मांडली आहे.  

पुणे : सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे सर्वच जण संभ्रमात आहेत. निवडणुका होऊन 26 दिवस झाले तरीही राज्यात कोणाची सत्ता येणार? कोण मुख्यमंत्री होणार याचा अंदाज अद्याप महाराष्ट्रातील जनतेला समजत नाहीये. त्यात महाराष्ट्राच्या सद्:परिस्थितीवर भाष्य करणारा तृतीयपंथी चांदणी गोरे यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ मार्फत तृतीयपंथी चांदणी, सत्ता आमच्या हातात द्या, सर्वांना सुतासारखं सरळ करू अशी मागणी करत आहे.  

तृतीयपंथी चांदणीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.'' निवडणुका होऊन 26 दिवस झाले तरी राज्याला मुख्यमंत्री मिळत नाही, राज्याचे राज्यपाल नागपूरवाल्यांचे  ऐकतायेत का, राष्ट्रपती गुजरातवाल्यांचे ऐकतायेत? असा आम्हाला प्रश्न पडला आहे. सरकार आमच्या ताब्यात द्या, सर्वांना सुता सारखं सरळ करू. सध्या सर्व सामान्य जनता आणि शेतकऱ्यांचे हाल होत आहे. कांद्याचे दर कोसळले आहेत. पिकांची नुकसान, विमा प्रकरण... अरे कुठे नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र?''अशी आक्रमक भूमिका तृतीयपंथी चांदणी यांनी व्हिडिओत मांडली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transgender Chandani Gore Video Viral On Social Media