Pune Crime : वरवंड येथे तृतीयपंथीचा राहत्या घरात गळा चिरून खून; आरोपी अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

transgender killed in residential house Varwand Accused in custody crime pune police

Pune Crime : वरवंड येथे तृतीयपंथीचा राहत्या घरात गळा चिरून खून; आरोपी अटकेत

वरवंड : वरवंड (ता.दौंड) येथे दोन दिवसापूर्वी तृतीयपंथीचा राहत्या घरात गळा चिरून निघृणपणे खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मात्र,यवत पोलिसांनी काही वेळातच तपासाची चक्रे फिरून संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

सचिन ऊर्फ सोनुदिदी दिनेश जाधव (वय ४० , मुळ,रा.वडापुर,ता.दक्षिण सोलापूर, सध्या रा वरवंड,ता.दौंड जि.पुणे) असे खून झालेल्या तृतीयपंथीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी चंद्रकांत ऊर्फ चंदर शिवाजी जाधव (वय ३०, रा. वरवंड ) या संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. ६ जुन रोजी रात्री ९ वाजण्याच्या आसपास ही घटना घडल्याचे समोर आले.

याबाबत खोली मालक बापू खोमणे यांनी फिर्याद दिली.त्यानुसार पोलिसांनी माहिती दिली.फिर्यादी बापू खोमणे यांच्या एका खोलीत तृतीयपंथी राहत होता. आज गुरुवारी (दि.८) सकाळी काही जणांना खोलीतून दुर्गंधी आल्याने संशय आला.याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली.त्यानुसार घटनेची माहिती मिळतात यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे,प्राविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी रेखा वाणी,पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, विजय कोल्हे आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी तृतीयपंथी याचा गळा चिरून हत्या केल्याचं प्रथम दर्शनी निदर्शनास आले. तसेच घरातील इतर साहित्य इतरत्र पडल्याचे दिसून आले.दोन दिवसांपूर्वी ही हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. . यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यामध्ये आरोपीवर संशय बळावला गेल्याने हवालदार निलेश कदम, संभाजी कदम, गुरु गायकवाड अक्षय यादव आदींच्या पथकाने अवघ्या काही वेळातच आरोपीला अटक केली. खून नेमका कोणत्या कारणावरून झाला याबाबत माहिती मिळू शकली नाही.