कॅशलेसमुळे सहकारात पारदर्शकता : राधामोहनसिंह 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

पुणे : "ग्रामीण भागातील शेवटच्या माणसाचा उत्कर्ष करण्याचे सामर्थ्य असलेल्या सहकार क्षेत्राला भ्रष्टाचाराचे गालबोट लागले आहे. कॅशलेश व्यवहारांमुळे या परिस्थितीत सुधारणा होऊन सहकारामध्ये पारदर्शकता येऊ शकते,'' असे मत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंग यांनी रविवारी व्यक्त केले. 

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थांच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ""सहकाराचे क्षेत्र गतिमान करण्यासाठी कुशल आणि संस्कारी मनुष्यबळाची आवश्‍यकता आहे,'' असेही ते म्हणाले. या वेळी राष्ट्रीय सहकारी संघ आणि प्रशिक्षण परिषदेचे खासदार डॉ. चंद्रपालसिंह यादव, खासदार अनिल शिरोळे, ज्येष्ठ सहकार नेते शिवाजीराव गिरिधर पाटील, गोखले अर्थशास्त्र संस्थेचे संचालक डॉ. राजस परचुरे, राष्ट्रीय सहकारी संघाचे महासंचालक सत्यनारायण उपस्थित होते. 

"अमूल' सारख्या राष्ट्रीय स्तरावरील ब्रॅंडची निर्मिती सहकारातूनच झाली, असे सांगून यादव म्हणाले, "नोटाबंदीच्या निर्णयानंतर इथून पुढच्या काळात इलेक्‍ट्रॉनिक पेमेंट आणि कॅशलेस अर्थव्यवस्था ही सहकार क्षेत्राला पूरक ठरणार आहे. त्यासाठी वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूट सारख्या संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.'' 

"सहकारामध्ये चांगला पैसा आहे; परंतु त्याचा उपयोग कसा होतो, हे महत्त्वाचे आहे. संस्कार असलेले नेतृत्व नसेल, तर सहकाराचा प्रभाव जाणवणार नाही. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा केवळ सहकारच सामना करू शकते. संस्थांचे संगणकीकरण आणि कॅशलेस व्यवहारातून सहकारामध्ये पारदर्शकता येईल,'' असेही यादव म्हणाले. 
या वेळी शिराळे आणि परचुरे यांचेही भाषणे झाली. 
 
Web Title: transparency in cooperation due to cashless