पीयूसीचे दर वाढलेले नाहीत : परिवहन आयुक्तांचे स्पष्टीकरण 

Transport Commissioner gives explanation PUC rates have not been increased
Transport Commissioner gives explanation PUC rates have not been increased

पुणे, त प्रदूषण नियंत्रण चाचणी (पीयूसी) प्रमाणपत्राचे दर अद्याप वाढविण्यात आलेले नाही, दरवाढीचा एकतर्फी निर्णय कोणीही घेऊ नये, असे राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी "सकाळ'शी बोलताना बुधवारी स्पष्ट केले. काही संघटनांनी दर वाढविण्याची मागणी केली असली तरी, शासन स्तरावर त्याबाबतचा निर्णय झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पीयूसीचे प्रमाणपत्राचे दर वाढविण्यात यावे, अशी मागणी मुंबईतील एका संघटनेने केली आहे. त्या बाबतचे निवेदन त्यांनी परिवहन सादर केले आहे. तसेच एक ऑक्‍टोबरपासून नव्या दराने ग्राहकांकडून शुल्क वसूल करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. मात्र, त्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने अद्याप मान्यता दिलेली नाही. या बाबत ढाकणे म्हणाले, "दरवाढ करण्यासाठी एक प्रक्रिया असते. त्यानुसार ती पूर्ण होते. संघटनेने किंवा कोणी मागणी केली की, लगेच दरवाढ होत नाही. दरवाढ करण्याची ज्या-ज्या संघटनांची मागणी असेल त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले जाईल. त्यानंतर दरवाढीच्या प्रस्तावावर राज्य सरकार विचार करून निर्णय घेईल.'' 

राज्यात प्रदूषण नियंत्रण चाचणी करणारी सुमारे 12 हजार केंद्र आहेत. दुचाकीच्या पीयूसी प्रमाणपत्रासाठी 35 रुपये, पेट्रोल वाहनांसाठी 90 रुपये, डिझेल वाहनांसाठी 110 रुपये आणि रिक्षासाठी 60 रुपये सध्या आकारले जातात. राज्य सरकारने हे दर 2011 मध्ये निश्‍चित केली आहे. त्यानंतर त्यात वाढ झालेली नसल्यामुळे या दरांत वाढ करण्याची मागणी केंद्रचालक करीत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या बाबत पुण्यातील पीयूसी केंद्रचालक भारत कळके म्हणाले, ""प्रदूषण नियंत्रण चाचणी प्रमाणपत्राची सक्ती सगळ्याच वाहनांना आहे. मात्र, तपासणीमध्ये पोलिसांनी सातत्य ठेवले पाहिजे. त्यातून नागरिकांमध्येही जागरूकता निर्माण होईल. सुधारित दर निश्‍चित झाल्यावर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नागरिकांना कळविले जातात, त्यानंतरच त्यांची अंमलबजावणी होते.'' 

पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर, मोटार वाहन कायद्यातील सुधारित तरतुदींनुसार संबंधित वाहनचालकांना सुमारे दोन हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. राज्यात मुंबईमध्येच पीयीसूची काटेकोर तपासणी होते. केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार प्रदूषण नियंत्रण चाचणी प्रमाणत्र देणारी यंत्रणा तीन वेळा अपडेट करण्यात आली आहे. मात्र, राज्यातील वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळ्या दरांनी पीयूसी शुल्काची वाहनचालकांकडून आकारणी होत असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. जादा दर आकारणाऱ्या केंद्र चालकांविरुद्ध नागदरिकांनी त्या-त्या केंद्रांत लेखी तक्रार केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com