esakal | वाहतुकीच्या शिस्तीसाठी "मिळून साऱ्याजणी' 
sakal

बोलून बातमी शोधा

traffic police

पहिल्या दिवसापासूनच मुख्य चौकांसह हद्दीतील चौकांमध्ये वाहतूक नियमनाला सुरुवात झाली, त्यामुळे चौका-चौकांमध्ये "मिळून साऱ्याजणी' वाहतुकीला शिस्त लावत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

वाहतुकीच्या शिस्तीसाठी "मिळून साऱ्याजणी' 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवारपासून पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेतील सर्वांत महत्त्वाच्या फरासखाना वाहतूक विभागाची संपूर्ण सूत्रे महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हाती आली. त्यानुसार, पोलिस आयुक्तांनी टाकलेला विश्‍वास सार्थ करण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच मुख्य चौकांसह हद्दीतील चौकांमध्ये वाहतूक नियमनाला सुरुवात झाली, त्यामुळे चौका-चौकांमध्ये "मिळून साऱ्याजणी' वाहतुकीला शिस्त लावत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पोलिस निरीक्षक स्वाती थोरात, साहाय्यक पोलिस निरीक्षक शीतल जाधव, पोलिस उपनिरीक्षक कीर्ती म्हस्के यांच्यासह 35 महिला पोलिस कर्मचारी रविवारपासून फरासखाना वाहतूक विभागामध्ये रुजू झाल्या. ज्येष्ठ वनस्पतितज्ज्ञ डॉ. हेमा साने यांनी फरासखाना वाहतूक शाखेमध्ये उपस्थिती लावून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. शहरात पहिल्यांदाच महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वाहतूक विभागाची पूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

""फरासखाना वाहतूक विभाग हा कायमस्वरूपी वर्दळ असणारा भाग आहे. मोठी बाजारपेठ, व्यापारी संकुल, गणेशोत्सव मंडळे या भागात आहेत. कुंभार वेस, गाडीतळ, जिजामाता चौक, बुधवार चौक व बेलबाग चौक हे महत्त्वाचे व गर्दीचे चौक आमच्या हद्दीमध्ये येतात. त्यामुळे वाहतूक नियमन करण्याबरोबरच वाहतुकीला शिस्त लावण्याची जबाबदारी आमच्यावर असेल, असे पोलिस निरीक्षक स्वाती थोरात यांनी सांगितले. 

अरुंद रस्त्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविणे हे आमच्यापुढील आव्हान असेल; परंतु पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम व अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय शिंदे यांनी आमच्यावर टाकलेला विश्‍वास सार्थ करून दाखवू. 
- स्वाती थोरात, पोलिस निरीक्षक

loading image