ट्रान्सपोर्ट हब स्वारगेटला उभारणार : माधुरी मिसाळ

TRANSPORT HUB
TRANSPORT HUB

पुणे : मेट्रोपासून रिक्षापर्यंत....शॉपिंग मॉल ते कमर्शिअल कॉम्प्लेक्‍स असलेले ट्रान्सपोर्ट हब स्वारगेट येथे उभारले जाणार आहे. याचे भुमीपुजन याच महिन्यात होईल. सुमारे 1600 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे काम मेट्रो कंपनी करणार आहे. "

पर्वती विधानसभा मतदार संघातील स्वारगेट हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा भाग आहे. या ठिकाणी हब उभारण्यासाठी पाठपुरावा केल्याचे आमदार माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परीषदेत सांगितले. यावेळी भाजपचे शहर सरचिटणीस खासगी सार्वजनिक सहभागातुन ( पीपीपी मॉडेल) हा ट्रान्सपोर्ट हब उभा केला जाईल. प्रकल्पासाठी 20 एकर जागा आवश्‍यक आहे. पीएमपी, एसटी आणि मनपाची एकुण 17 एकर जागा ताब्यात आली आहे. विपश्‍यना केंद्राची 3 एकर जागा मिळविण्याचा प्रयत्न आहे. विपश्‍यना केंद्राची जागाही महापालिकेचीच असुन, ती संबंधित संस्थेला भाडेतत्वावर दिली आहे. त्यांना पर्यायी जागा देण्यासंदर्भातही विचार सुरू आहे. केंद्राची जागा मिळाली नाही तरी प्रकल्पाचे काम केले जाऊ शकते. केंद्राची जागाही या भागातील वाहतुक वळविण्यासाठी उपयुक्त ठरू शकते'' असे मिसाळ यांनी नमूद केले. 

" स्वारगेट येथे सध्या मेट्रो स्थानकाचे काम सुरू झाले आहे. त्याठिकाणी खोदाई सुरू असुन, याच भागात ट्रान्सपोर्ट हब उभे करण्याचे काम मेट्रो कंपनीला दिले आहे. याप्रकल्पासाठी सुमारे 1600 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तो महापालिका करु शकत नसल्याने "पीपीपी' पद्धतीने केला जात आहे. याचे काम सुरू झाल्यानंतर साधारणपणे तीन वर्षांत हे काम पुर्ण होईल. याठिकाणी मेट्रो स्टेशन, एसटी आणि पीएमपी स्थानक, रिक्षा आणि खासगी प्रवासी वाहतुक करणाऱ्या चार चाकी वाहनांसाठी स्टॅंड असेल. शॉपिंग मॉल, कमर्शिअल कॉम्प्लेक्‍स अशा सर्व सुविधा उपलब्ध होणार आहे. '' असे मिसाळ यांनी सांगितले. 

स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गासाठी गंगाधाम ते शत्रुजंय मंदीर ते कात्रज, सातारा रस्ता ते बिबवेवाडी रस्ता ते अप्पर इंदीरानगर असे पर्याय आहे. त्यासंदर्भात प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे. अप्पर इंदीरानगर येथे मेट्रोच स्थानक उभारून तेथून बसने कात्रजपर्यंत सेवा देता येईल. अप्पर इंदीरानगर येथून पुंरदर तालुक्‍यातील विमानतळाशी मेट्रोला जोडणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे यापर्यायाचा विचार केला जाऊ शकतो अशी माहिती मिसाळ यांनी दिली. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com