एकात्मिक वाहतूक निर्माण करणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

पुणे - शहर आणि पिंपरी िंचंचवडच्या प्रवाशांना मेट्रोची सेवा उपलब्ध करून देतानाच एकात्मिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याची ग्वाही महामेट्रोच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दोन्ही महापालिकांचे आयुक्त आणि पीएमपीच्या अध्यक्षांनी बुधवारी दिली. मेट्रोचे काम वेळेपूर्वीच पूर्ण करतानाच जागतिक दर्जाची सेवा प्रवाशांना देण्यात येईल, अशी ग्वाही या प्रसंगी मेट्रोने दिली.

पुणे - शहर आणि पिंपरी िंचंचवडच्या प्रवाशांना मेट्रोची सेवा उपलब्ध करून देतानाच एकात्मिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याची ग्वाही महामेट्रोच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दोन्ही महापालिकांचे आयुक्त आणि पीएमपीच्या अध्यक्षांनी बुधवारी दिली. मेट्रोचे काम वेळेपूर्वीच पूर्ण करतानाच जागतिक दर्जाची सेवा प्रवाशांना देण्यात येईल, अशी ग्वाही या प्रसंगी मेट्रोने दिली.

वर्धापनदिनानिमित्त महामेट्रोने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात पुण्याचे आयुक्त सौरभ राव, पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे, मेट्रोचे तांत्रिक शशिकांत लिमये, वनस्पतीतज्ज्ञ श्री. द. महाजन, मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्षा मेघराज राजेभोसले, रुबी हॉस्पिटलचे डॉ. पी. के. ग्रॅंट, रांका ज्वेलर्सचे वस्तुपाल रांका, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, मिटकॉनचे डॉ. टी. एम. परचुरे व आर. एस. नागेशकर आदी उपस्थित होते.

राव म्हणाले, ‘‘मेट्रोच्या कामांमुळे सध्या नागरिकांची काही रस्त्यांवर गैरसोय होत असली, तरी दीर्घकाळाच्या फायद्यासाठी अल्पकाळातील गैरसोय सहन करण्याची पुणेकरांची तयारी आहे. पूरक एकात्मिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी महापालिका अग्रभागी आहे.’’ हर्डीकर यांनीही नागरिकांचा विरोध आता कमी झाला असून बीआरटी आणि पीएमपीच्या माध्यमातून दर्जेदार एकात्मिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याची गरज स्पष्ट केली. पीएमपी आणि मेट्रो परस्परांचे स्पर्धक असले तरी, पूरक व्यवस्था म्हणून ते काम करून शहरातील वाहतुकीची समस्या दूर करतील, अशी अपेक्षा गुंडे यांनी व्यक्त केली. 

दीक्षित यांनी मेट्रोच्या दोन वर्षांच्या कामाचा आढावा घेतला आणि एसटी, पीएमपीची स्थानके यांचा एकात्मिक वाहतूक व्यवस्थेत समावेश करण्यात येईल, असे स्पष्ट केले. तसेच सौर ऊर्जेचा वापर करून सुमारे ७५ टक्के वीज निर्माण करण्याचे मेट्रोचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. सूत्रसंचालन योगेश देशपांडे यांनी केले. महामेट्रोचे संचालक रामनाथ सुब्रह्मण्यम यांनी आभार मानले.

कर्वे रस्त्यावर व्यवसाय घटला 
मेट्रोच्या कामांमुळे कर्वे रस्त्यावरील व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे, याकडे वस्तुपाल रांका यांनी लक्ष वेधले. 

या रस्त्यावरील व्यवसायात ‘पार्किंग’अभावी आणि वाहतूक कोंडीमुळे सुमारे ५० टक्‍क्‍यांनी घट झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. 

लोकप्रतिनिधी कार्यक्रमापासून दूर 
महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारतर्फे मेट्रो प्रकल्प राबविला जात आहे. मात्र, महामेट्रोच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला महापौर, पदाधिकारी, आमदार, खासदार आणि पालकमंत्री यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी मेट्रोच्या कामांवर टीका केली होती. त्यामुळेच महामेट्रोने लोकप्रतिनिधींना आमंत्रित केले नसावे, अशी चर्चा कार्यक्रमानंतर होती. या बाबत महामेट्रोकडे विचारणा केल्यावर राजकीय व्यक्तींना कार्यक्रमाला बोलाविणार नव्हतोच, असे सांगण्यात आले.

Web Title: Transport Metro Anniversary Day