वाहतूक अभियानामुळे वाहनचालकांमध्ये जागृती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

पुणे - शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या वाहतूक अभियानामुळे वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागृती होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या पुढाकाराने, रोटरी क्‍लब आणि शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने हे संयुक्‍त अभियान सुरू आहे. ‘रोटरी क्‍लब ऑफ पुणे ईस्ट’च्या वतीने सोमवारी टिळक रस्त्यावर अभिनव चौकात वाहतूक अभियान राबविण्यात आले. 

सदस्यांच्या हातात कॅमेरे आणि मोबाईल पाहताच वाहनचालकांनी हात उंचावून त्यांना अभिवादन केले. या अभियानामुळे नागरिकांमध्ये जागृती होत आहे, तसेच वाहतुकीबाबत शिस्त वाढल्याचे दिसून येत आहे असे आवर्जून सांगत, ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘रोटरी’च्या या उपक्रमास धन्यवाद दिले.  

दरम्यान, प्रकल्प संयोजक आणि ‘रोटरी क्‍लब ऑफ पुणे ईस्ट’चे सदस्य दिलीप देशपांडे यांनी वाहनचालकांना शिस्तबद्ध वाहतुकीसाठी शपथ घेण्याचे आवाहन केले. त्याला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘आम्ही वाहतुकीचे नियम कधीही मोडणार नाही. पुणे शहराला स्मार्ट सिटी बनविण्याचा आम्ही निर्धार करतो,’ अशी शपथ नागरिकांनी घेतली. या वेळी हेल्मेट परिधान केलेल्या आणि वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहनचालकांचा ‘रोटरी क्‍लब ऑफ पुणे ईस्ट’चे अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी, विनय पाटील आणि माणिक ओसवाल यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सचिव अभय जोशी, सदस्य सुरेश शहा, दिनेश बोराणा, दत्तप्रसाद जोशी, पुरुषोत्तम लांडगे, योगिता वैशंपायन, नरेंद्र शहा, जया शहा, चित्रा देशपांडे, इन्शा जोशी, कांतिलाल छाजेड, उदय कुलकर्णी, सुनील शहा, साहिल शहा, संजय डांगरे, विनोद गांधी, कीर्ती दवे, इला दवे आणि अर्चना लांडगे यांनी अभियानात सहभाग घेतला.

पीएमपी बसचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन
सारसबागेकडून स्वारगेटकडे जाताना सिग्नलला लाल दिवा असूनही पीएमपी बस जात होती. वारजे माळवाडीकडे जाणारा पीएमपी बसचालकही नियमांचे उल्लंघन करून जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे पादचाऱ्यांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना रस्ता ओलांडणे अवघड होत होते.

Web Title: transport rules driver publicity