बोरघाटात द्रुतगती मार्गावर वाहतूक संथ गतीने

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

लोणावळा : बोरघाटात पावसाची संततधार सुरूच असल्याने बोरघाटातील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. पावसामुळे रस्ता निसरडा झाला आहे. त्यामुळे वाहने घसरण्याची शक्यता असल्याने वाहतूक हळुवार सुरू आहे.
 
लोणावळा : बोरघाटात पावसाची संततधार सुरूच असल्याने बोरघाटातील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. पावसामुळे रस्ता निसरडा झाला आहे. त्यामुळे वाहने घसरण्याची शक्यता असल्याने वाहतूक हळुवार सुरू आहे.

विशेषतः मुंबईहुन पुण्याकडे येताना अमृतांजन पुलाजवळील चढावर वाहनांच्या रांगा लागल्या. मुसळधार पाऊस आणि रेल्वेच्या वतीने घेण्यात आलेला ब्लॉक यामुळे पुणे-मुंबई दरम्यान अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे द्रुतगती मार्गावरील वाहनांची वर्दळ वाढली आहे.

बोरघाट दस्तुरी पोलीस मदत केंद्र ते खंडाळा एक्झिट दरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहतुक संथ गतीने सुरू आहे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: transport slow down at Borghat Expressway