पुण्यातून पिंपरी चिंचवडला जायचे आहे, मग 'हे' नक्की वाचा 

transportation is resumes at Pimpri Chinchwad to Pune
transportation is resumes at Pimpri Chinchwad to Pune

पुणे : व्यवसाय- उद्योगासाठी पुण्यातून पिंपरी चिंचवडला जायचे आहे, मग आता खुशाल जा... कारण दोन्ही शहरांदरम्यान वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस सतर्क झाले आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुण्यातील वाहतूक शाखेतील सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख या बाबत म्हणाले, ''पुण्यातून पिंपरी चिंचवडला वाहतूक सुरू झाली आहे. राज्य सरकारने दुचाकीवर एकच व्यक्ती, रिक्षात चालक आणि दोन प्रवासी, मोटारीत चालक आणि दोन प्रवासी तर लहान मोठ्या बसमध्ये क्षमतेच्या निम्मीच प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. या आदेशाची अंमलबजावणी पोलिस करीत आहेत. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रातील वाहतुकीवरील निर्बंध कायम आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.''

गुड न्यूज गुड न्यूज : कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा रेट मंदावतोय; वाचा सविस्तर आकडेवारी

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील वाहतूक शाखेच्या प्रमुख निलम जाधव म्हणाल्या, ''पुणे आणि पिंपरी चिंचवड दरम्यानची वाहतूक सुरू झाली आहे. दोन्ही शहरांच्या चेकपोस्टवर पोलिस आहेत. राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी पोलिस करीत आहेत. तसेच महामार्गांवरही पोलिस नियमन करीत आहेत. दोन दिवसांपासून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनीही गरजेनुसारच वाहतूक करावी, असे आवाहन करण्यात येत आहे, असेही त्यांनी नमूद केले''. 

- पुणेकरांनो सावधान : पुढचे चार दिवस धोक्याचे, हवामान खात्यानं दिलाय इशारा

पिंपरी चिंचवडचा समावेश रेड झोनमध्ये होता. राज्य सरकारने दहा दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडचा रेड झोन काढून घेतला. त्यामुळे 26 मे पासून तेथे पीएमपीची वाहतूकही सुरू झाली आहे. तत्पूर्वी दोन्ही शहरांच्या सीमा सील करण्यात आल्या होत्या. आता पिंपरी चिंचवडमध्ये उद्योग- व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे. पुण्यातूनही मोठ्या संख्येने कामगार तेथे जातात. त्यामुळे त्यांना प्रशासनाने पासशिवाय परवानगी दिली आहे. तसेच दोन्ही शहरांतून व्यावसायिकांचीही आणि माल वाहतुकीचीही ये-जा सुरू झाली आहे. त्यामुळे दोन्ही शहरांच्या सीमा आता खुल्या करण्यात आल्या आहेत. 

- पैसे गेले अन् गाडीही सुटली; परराज्यातील कामगारांवर भामट्यांमुळे आली ही वेळ!

बोपोडीतील हॅरीस पूल आणि औंधमधील राजीव गांधी पुलावरील वाहतूक खुली करण्यात आली आहे. दोन्ही पुलांवर पोलिस आहेत. तसेच रात्री 9 ते पहाटे 5 दरम्यान दोन्ही शहरांत संचारबंदी कायम आहे. त्याचीही अंमलबजावणी पोलिस करीत आहेत, अशीही माहिती पोलिसांनी दिली. 

- Big Breaking : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द; मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली घोषणा!

पुण्यात प्रतिबंधित क्षेत्रातील वाहतूक अद्याप खुली कऱण्यात आलेली नाही. तेथील निर्बंध कायम आहेत. या बाबत पुण्यात राहणारे आणि भोसरीमध्ये कारखाना असलेले व्यावसायिक प्रदीप सिन्नरकर म्हणाले, भोसरी औद्योगिक वसाहतीमधील कारखाने सुरू झाले आहेत. पुण्यात राहणारे परंतु या औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारे कामगारांचीही वाहतूक नियमितपणे सुरू झाली आहे. त्यासाठी कोणत्याही पासची गरज राहिलेली नाही. या बद्दल पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांचे उद्योजकांतर्फे मी आभार मानतो. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com